• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING : आदित्य ठाकरेंसाठी सोडली जागा आता मिळाली आमदारकीची संधी, रामदास कदमांना बाहेरचा रस्ता!

BREAKING : आदित्य ठाकरेंसाठी सोडली जागा आता मिळाली आमदारकीची संधी, रामदास कदमांना बाहेरचा रस्ता!

विधान परिषदेच्या जागेसाठी (Maharashtra Legislative Council election) शिवसेनेनं (shivsena) एकाच दगडात निशाणा साधून पक्षासोबत एकनिष्ठ न राहणाऱ्यांना धडा शिकवला आहे.

विधान परिषदेच्या जागेसाठी (Maharashtra Legislative Council election) शिवसेनेनं (shivsena) एकाच दगडात निशाणा साधून पक्षासोबत एकनिष्ठ न राहणाऱ्यांना धडा शिकवला आहे.

विधान परिषदेच्या जागेसाठी (Maharashtra Legislative Council election) शिवसेनेनं (shivsena) एकाच दगडात निशाणा साधून पक्षासोबत एकनिष्ठ न राहणाऱ्यांना धडा शिकवला आहे.

  • Share this:
मुंबई, 19 नोव्हेंबर : विधान परिषदेच्या जागेसाठी (Maharashtra Legislative Council election) शिवसेनेनं (shivsena) एकाच दगडात निशाणा साधून पक्षासोबत एकनिष्ठ न राहणाऱ्यांना धडा शिकवला आहे. आदित्य ठाकरे (aditya thackery) यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या सुनिल शिंदे (sunil shinde) यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्याविरोधात भाजपला (bjp) रसद पुरवणाऱ्या रामदास कदम (ramdas kadam) यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांपैकी सर्वश्री रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. त्यामुळे या जागेसाठी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेनं  मुंबईतून विधान परिषदेसाठी सुनिल शिंदेंना उमेदवारी दिली आहे. सुनिल शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडला होता. त्यावेळी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, असं आश्वासनं दिलं होतं. अखेर सेनेकडून सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात येत आहे. सरोगसी म्हणजे काय नेमकं काय? त्यामुळे प्रीती झिंटा बनली जुळ्या मुलांची आई तर दुसरीकडे शिवसेनेचे आणि परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पुरावे दिल्याचा आरोप आहे. एवढंच नाहीतर रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाल्या आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर नाराज होते. अखेरीस ऑडिओ प्रकरण रामदास कदम यांच्या चांगलेच अंगी आले आहे. शिवसेनेनं विधान परिषदेसाठी कदमांचा पत्ता कट केला आहे. आता प्रत्यक्षात येतेय हवेत उडणारी कार, भारतीय तंत्रज्ञाचाही हातभार शिवसेनेनं एकाप्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्याला सन्मान करत पक्षासोबत निष्ठा न राखणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आगामी काळात रामदास कदम काय निर्णय घेता हे पाहण्याचे ठरणार आहे. असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने मुंबई मतदारसंघाकरिता दोन सदस्यांची मुदत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी समाप्त होत असल्याने बृहन्मुंबईत दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांपैकी सर्वश्री रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक - 14 डिसेंबर 2021 निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 16 डिसेंबर 2021
Published by:sachin Salve
First published: