मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Ramdas Kadam: "मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही, पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार" : रामदास कदम

Ramdas Kadam: "मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही, पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार" : रामदास कदम

"मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही, लवकरच गौप्यस्फोट करणार"

"मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही, लवकरच गौप्यस्फोट करणार"

Ramdas Kadam: शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं, लवकरच पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार आहे.

मुंबई, 17 नोव्हेंबर : शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे (Viral audio clip) क्लिपमुळे शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं होतं. या घटनेनंतर रामदास कदम हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही उपस्थित नव्हते, तब्येतीचं कारण सांगत रामदास कदम दसरा मेळाव्याला अनुपस्थित राहिले होते. मात्र, आता रामदास कदम हे शक्तीस्थळावर बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) अभिवादन करण्यासाठी आले आणि त्यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली. लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रामदास कदम म्हणाले, मराठी माणूस ताठ मानेने जगतोय तो बाळासाहेबांमुळेच. आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना बाळासाहेबांनी मोठे केले. मी कडवा शिवसैनिक आहे. शेवटपर्यंत भगव्याशी बेईमानी करणार नाही. मी पत्रकार परिषद गेऊन अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे, गौप्यस्फोट करणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अनिल परब आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधातील पुरावे शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पीए प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आज खेडमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ऑडिओ क्लिपसह पुरावे सादर केले होते.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील रिसॉर्ट आणि बंगल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पीए प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला होता. कदम यांनी प्रसाद कर्वे, रामदास कदम यांचे आणि किरीट सोमय्या यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग देखील माध्यमांसमोर सादर केले होते.

वाचा : दसरा मेळाव्यापूर्वी रामदास कदम यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे कोण?

प्रसाद उर्फ बाळा कर्वे हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. कधीकाळी मातोश्रीवर प्रसाद कर्वे यांना थेट प्रवेश दिला जात होता. बाळा कर्वे असे ओळख असलेले प्रसाद कर्वे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुजारी म्हणून ओळखले जायचे. काही वर्ष मुंबईत भडजी म्हणून काम केल्यानंतर प्रसाद कर्वे दापोलीत आले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मुळगाव मुरुड येथील रहिवासी असलेले प्रसाद कर्वे सध्या वास्तव्यास दापोलीत आहेत.

गेली अनेक वर्ष पुजारी म्हणून त्यांची ओळख आहे. अलीकडे त्यांना सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या पूजेवर सुरू आहे. समाज हितासाठी ते गेले अनेक वर्ष माहितीच्या अधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखली जात आहेत. आजपर्यंत त्यांनी 13000 माहिती अधिकाराचा अर्ज केला आहे, त्यांच्या माहिती अधिकारामुळे अनेक लोकांना न्याय सुद्धा मिळाला आहे.

कधीकाळी 'मातोश्री'वर प्रसाद कर्वे यांचा थेट संपर्क असल्याने शिवसेनेत त्यांच्या शब्दाला खूप वजन होते. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात होते. परंतु अलीकडे ते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील बेकायदेशीर सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या काही हॉटेल व्यवसायिकांची माहितीच्या अधिकारात त्यांनी माहिती मागवली होती.

First published:

Tags: Ramdas kadam, Shiv sena