स्वप्नील घाग, प्रतिनिधी रत्नागिरी, 15 जून : कोरोना व्हायरसच्या भीतीने जगभरात मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आता नियमित होऊ लागला आहे. इतरांपासून आपल्याला संक्रमण होऊ नये यासाठी प्रत्येकजण विशेष काळजी घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे या जागतिक महामारीच्या काळात देखील अनेकजण आपली हौसमौज देखील पूर्ण करत असल्याचे समोर येतं आहे. रत्नागिरी शहरातल्या मांडवी येथे राहणाऱ्या एका पठ्ठ्याने चेहऱ्याला बांधण्यासाठी चक्क चांदीचा मास्क वापरत असल्याचे समोर आले आहे. 60 ग्रॅम वजनाचा हा मास्क असल्याची माहिती शेखर सुर्वे यांनी दिली आहे. हेही वाचा- मेहनत आणि जिद्दीला यश! रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीमध्ये मिळवले 99.98 टक्के याबाबत शेखर सुर्वे सांगतात की, ‘केवळ आवड म्हणून मी हा मास्क वापरत आहे. सोशल मीडियावर या मास्कची डिझाइन पाहिल्यावर त्यांना ती आवडली आणि त्यांनी थेट कोल्हापूर येथून या मास्कची खरेदी केली आहे. सुर्वे यांनी आवड म्हणून हा मास्क खरेदी केला. 60 ग्रामचा हा मास्क असून त्याची किंमत 3900 रुपये इतकी आहे. सुर्वे यांनी काही दिवसांपूर्वी एक फोटो मोबाईलवर बघितला होता तसा मास्क त्यांना हवा आहे. म्हणून त्यांचा सोनार हंसराज ज्वेलर्स यांना दाखवला असता त्यांनी तो बनवून दिला. **हेही वाचा-** धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचे आले रिपोर्ट, डॉक्टर म्हणाले… केवळ एक हौस म्हणून आपण हा मास्क घेतल्याचे त्यांनी सांगितले. पण, संपूर्ण रत्नागिरीमध्ये शेखर सुर्वे यांच्या चांदीच्या मास्कची चर्चा सध्या जोरात सुरू असून, हौसेला मोल नाही म्हणतात तेच खरं. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.