मुंबई, 6 मे: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) कायदा रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी (5 मे 2021) दिला. यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरूवात झाली. आता महाविकास आघाडीचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक विनंती केली आहे तसेच मराठा समाजाने कुणाच्याही चिथावणीला बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका अशोक चव्हाण यांनी म्हटलं, आज सकाळपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात मराठा संघटनांना चिथावणी देण्याचे काम विरोधक करत आहेत. या संदर्भात गृह विभागाला सुद्धा माहिती मिळत आहे. कृपया वस्तूस्थिती समजून घ्या आणि कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, आपल्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहे. मला देवेंद्र फडणवीस यांना विनंती करायची आहे की, तुमच्या पक्षातील काही लोक चिथावणी देत आहेत त्यांनी अशा प्रकारे कृती करू नये. वाचा: Maratha Reservation: आता सगळं तुमच्या हाती, 370 कलम हटवताना दाखवलीत तीच हिंमत यासाठी दाखवा सत्तेसाठी राजकीय पोळी भाजण्याचे काम करू नये अशोक चव्हाण यांनी पुढे म्हटलं, सत्तेसाठी राजकीय पोळी भाजण्याचे काम करू नये. दिशाभूल करण्याचे काम फडवणीस यांनी केले. सेक्शन 18 प्रमाणे, जूना कायदा अस्तित्व राहणार नाही हे सांगितले होते. आता महाराष्ट्रात केलेला कायदा वैध ठरला नाही, त्यावेळेस खबरदारी घेतली असती तर योग्य ठरले असते. केंद्र सरकारने ज्या प्रमाणे कलम 370 केला त्याच प्रमाणे केंद्र सरकारने निर्णय घ्यावा. राजकीय फायद्यासाठी चुकीची विधाने विरोधकांनी करू नये. वाचा: Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय माझा राजीनामा मागणे योग्य नाही येत्या दोन दिवसात मंत्री उपसमितीची बैठक आयोजन होईल. राजकीय विधाने काही नेते करतात. माझा राजीनामा मागणे योग्य नाही. विधानसभा निवडणूक डोळ्या समोर भाजपा सरकारने निर्णय घेतला होता हे सिद्ध होत आहे. लोकसभेत यात चर्चा करावी निर्णय घ्यावे, राज्याचे अधिकार अबाधित राहावे असंही अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे. हवं तर क्रेडिट घ्या पण मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा देवेंद्र फडवणीस यांनी भाजपाला क्रेडिट मिळू नये म्हणून आताच्या सराकरने ही भूमिका घेतली असा आरोप केला होता त्यावर अशोक चव्हाण म्हणाले तुम्ही कायदा केला त्यावेळेस क्रेडिट फडवणीस यांच्या सरकारने घेतले होते. आता पण हा विषय तुम्ही मार्गी लावा यांनी, फडणवीस आणि केंद्र सरकार निर्णय घ्यावा हवं तर क्रेडिट घ्यावा असंही अशोक चव्हाण म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.