• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • aryan khan bail : आर्यन खान उद्या सकाळी 11 वाजेनंतरच पोहोचणार मन्नत बंगल्यावर!

aryan khan bail : आर्यन खान उद्या सकाळी 11 वाजेनंतरच पोहोचणार मन्नत बंगल्यावर!

उद्या सकाळी 11 वाजेनंतर आर्यनची जेलमधून सुटका होणार आहे. कारण, पहाटे 5.30 वाजता जेलमधील जामीन बॉक्स उघडला जाईल.

उद्या सकाळी 11 वाजेनंतर आर्यनची जेलमधून सुटका होणार आहे. कारण, पहाटे 5.30 वाजता जेलमधील जामीन बॉक्स उघडला जाईल.

उद्या सकाळी 11 वाजेनंतर आर्यनची जेलमधून सुटका होणार आहे. कारण, पहाटे 5.30 वाजता जेलमधील जामीन बॉक्स उघडला जाईल.

  • Share this:
    मुंबई, 29 ऑक्टोबर : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan bail) जामिनावर सुटका झाली आहे. पण, कायदेशीर बाबी पूर्ण न झाल्यामुळे आर्यनचा आजचा मुक्काम जेलमध्येच (Arthur Road Jail mumbai)  काढावा लागला. आर्यनच्या वतीने कोर्टातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून जेल प्रशासनाच्या नियमानुसार उद्या सकाळी 11 वाजेनंतर जेलमधून त्याला बाहेर पडता येईल. मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे. आर्यनला अटी शर्तीसह 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.  गेल्या 25 दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात असलेल्या आर्यन खानसह तिघांची जामिनावर सुटका होणार म्हणून शाहरुख खानचे चाहते जेलबाहेर आतुरतेनं वाट पाहत होते. शेअर बाजारातील पडझडीदरम्यान 'हे' दोन स्टॉक खरेदीचा ब्रोकरेजचा सल्ला आर्यनचे वकील सतिश माने शिंदे, मुनमुनचे वकील काशिफ खान आणि  टीम सेशन्स कोर्टात पोहोचली. अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या सुअरिटी करता आली.आर्यन करता जुही चावला जामीनदार म्हणून सही केली. पण, जामिनासाठी लागणारी कागदपत्र हे वेळेवर आर्थर रोड जेलमध्ये पोहचली नाही. जामीन अर्ज पेटीमध्ये कागदपत्र 5.30 वाजेपर्यंत पोहोचणे गरजेचं होतं. पण, 5.30 वाजता पेटी उघडली असता आर्यनच्या जामिनाबाबत कोणतेही कागदपत्र आढळून आली नाही. त्यामुळे आर्यनला आजची रात्र जेलमध्येच घालवावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये 40 जागांसाठी भरती; या लिंकवर करा अप्लाय उद्या सकाळी 11 वाजेनंतर आर्यनची जेलमधून सुटका होणार आहे. कारण, पहाटे 5.30 वाजता जेलमधील जामीन बॉक्स उघडला जाईल. त्यामध्ये  मुंबई सत्र न्यायालयाने आर्यनला दिलेली रिलीज ऑर्डर टाकली जाणार आहे. ही रिलीज ऑर्डर जेलच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे.  मात्र तरीही सकाळी 11 वाजेशिवाय आर्यन बाहेर येणार नाही.  कारण रिलीज ॲार्डर जेल प्रशासनास मिळाल्यानंतर सकाळी कोर्ट उघडल्यावर जेल प्रशासन कोर्ट प्रशासनाकडून रिलीज ॲार्डर कन्फर्म करुन घेणार आहे. या प्रक्रियेला सकाळचे 10 वाजणार आहे. तिथून पुढे आर्यनला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. आर्यनला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दरम्यान, मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू होता. अखेरीस आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी जमेची बाजू लावून धरत आर्यन खानला जामीन मिळवून दिला.आता आर्यनसही तिघांची जामिनीवर सुटका होणार आहे. जामीन अर्जामध्ये अनेक अटींची आर्यनला पालन करावे लागणार आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी दान केले 50 लाख; डॉक्टरही नसलेल्या गावात हॉस्पिटल एकूण 5 पानांची ॲार्डर आहे. 1 लाख रुपयांचा जातमुचलक्यावर प्रत्येकी जामीन मंजूर करण्यात आला आहे. असा गुन्हा परत करू नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, देश सोडू नये,  मीडियाची, सोशल मीडियावर बोलू नये असे नियम घालण्यात आले आहे. त्याचबरोबर ncb ऑफिसमध्ये प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात हजर राहावे लागणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published: