बालोद, 29 ऑक्टोबर : आजकाल प्रत्येकजण स्वत:च्याच कामात इतका गुंतून गेला आहे की, समाजसेवा, सामाजिक कार्याचा (Social Work) विचार करणारे फार कमी लोक दिसत आहेत. समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेले लोक आजही आहेत आणि ते त्यांचं वेगळंपण दाखवून देतात. असेच असलेले एक संत गुरुसुख दास साहेब (Sant Gurusukh Das Saheb) यांनी गावात रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे या रुग्णालयासाठी येणारा 30 ते 50 लाख रुपयांचा खर्च ते स्वत: करणार आहेत. आपल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी स्वखर्चातून गावात रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातील ही घटना आहे. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि कुणालाही उपचारासाठी भटकावे लागू नये, या उद्देशाने बालोद जिल्ह्यातील या संताने पुढाकार घेऊन आपल्या गावात रुग्णालयाची इमारत बांधण्यास सुरुवात केली आहे. ज्या गावात पूर्वी एक डॉक्टर मिळणं मुश्कील होतं, त्या गावात आज मोठं रुग्णालय बांधण्याची लगबग सुरू झाली आहे. बालोड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 28 किमी अंतरावर असलेल्या दुपचेरा (Dupchera village) गावात 50 लाख रुपयांच्या देणगीतून एक रुग्णालय बांधले जात आहे. 85 वर्षीय संत गुरुसुख दास साहेब यांनी गावात रुग्णालय बांधण्यासाठी आपली रक्कम दान केली. पत्नीच्या निधनानंतर गुरुसुख दास यांनी रुग्णालयासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. रक्कम दिल्यानंतर ग्रामविकास समिती व ग्रामपंचायतीच्या संमतीनंतर पंचायतीजवळील शासकीय जमिनीवर रुग्णालय उभारणीचे कामही सुरू झालं आहे. हे वाचा - Gold Rate Today: दिवाळीआधीच सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज गोल्ड 8330 रुपयांनी स्वस्त त्यामुळे रुग्णालय बांधण्याचा निर्णय गावात दवाखाना आणि कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधेअभावी गावातील लोकांना होणारा त्रास पाहता गुरुसुख दास यांनी लाखो रुपयांची आयुष्यभराची ठेव दान केली आहे. गुरुसुख गावातील तलावाजवळ असलेल्या घरात एकटेच राहतात. 18 मे 2021 रोजी त्यांची पत्नी सोनाबाई यांचे निधन झालं. त्यांना मुले नाहीत. त्यामुळे पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी आता आपली संपूर्ण मालमत्ता धर्मादाय कार्यात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. गावात रुग्णालय बांधण्यासाठी देणगीदार गुरुसुख दास यांच्यासह गावचे प्रमुख, सरपंच आणि इतर वरिष्ठांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल, जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी त्याला संमती मिळवली. मुख्यमंत्री बघेल यांनीही या कामाचं कौतुक केलं. हे वाचा - भर उन्हात काम करून थकली; विसावा घेण्यासाठी माडाखाली गेलेल्या शेतकरी महिलेचा दुर्दैवी अंत वेळेवर उपचार मिळत नव्हते गुरुसुख दास साहेबांनी सांगितले की, मानवजातीची किंवा इतर प्राण्यांची सेवा ही जीवनातील सर्वात मोठी सेवा आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व जीवांची सेवा केली पाहिजे. सामान्य प्रकृती बिघडल्याने अनेकवेळा ग्रामस्थांना उपचारासाठी भटकंती करावी लागते. रुग्णालयाच्या अंतरामुळे ग्रामस्थांना येण्या-जाण्यात अडचण व वेळेची कमतरता यामुळे वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. मात्र, रुग्णालय बांधल्यानंतर येथे लोकांना उपचार घेता येणार आहेत. त्यांची चांगली सोय होईल. गुरुसुख साहेबांनी मानवसेवेवर भर दिला असून सर्व गोरगरीबांची सेवा केली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







