• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Share Market Update : शेअर बाजारातील पडझडीदरम्यान 'हे' दोन स्टॉक खरेदीचा ब्रोकरेजचा सल्ला

Share Market Update : शेअर बाजारातील पडझडीदरम्यान 'हे' दोन स्टॉक खरेदीचा ब्रोकरेजचा सल्ला

सेन्सेक्स (Sensex) 677 अंकांनी किंवा 1.13 टक्क्यांनी घसरुन 59306 अंकावर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 185 अंकांच्या किंवा 1.04 टक्क्यांच्या घसरणीसह 17671 वर बंद झाला.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) 677 अंकांनी किंवा 1.13 टक्क्यांनी घसरुन 59306 अंकावर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 185 अंकांच्या किंवा 1.04 टक्क्यांच्या घसरणीसह 17671 वर बंद झाला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज 259.57 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. CNBC-Awaaz वर दररोज दुपारी 2 वाजल्यापासून बाजार बंद होईपर्यंत 'कमाई का अड्डा' या शोमध्ये एक विशेष सेगमेंट Dealing Rooms Check सादर केला जातो. ज्यामध्ये यतीन मोटा शेअर खरेदी आणि विक्री बाबत सल्ला देतात. तसेच येत्या काळात कोणता स्टॉक किती रुपयांनी वाढू शकतो. गुंतवणूकदार आज कोणत्या शेअरवर आपली पोझिशन बनवू शकतात? त्याची संपूर्ण माहिती या विशिष्ट सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यात येते. शेअर बाजारात आठवडाभरात गुंतवणूकदारांचे 4.82 लाख कोटी बुडाले; आजही बाजारात घसरण डीलिंग रूम चेकमधील सल्ला अदानी ईएनटी (Adani ENT) ब्रोकरेजने आज डीलिंग रूममध्ये त्यांच्या ग्राहकांना अदानी ईएनटी स्टॉकवर खरेदीचता सल्ला दिला. डीलर्सनी BTST स्ट्रॅटेजी दिली आहे म्हणजे या स्टॉकमध्ये आज खरेदी करा आणि उद्या विक्री करा. यतीन म्हणाले की डीलर्सना या स्टॉकमध्ये 1460-1475 रुपयांची पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. या स्टॉकमध्ये नोव्हेंबरच्या सीरिजमध्ये फ्रेश लाँग्स तयार होताना दिसत आहेत. Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' स्टॉकमध्ये आज 10 टक्के वाढ, खरेदीबाबत तज्ज्ञांचं मत काय? रॅमको सिमेंट (RAMCO Cement) दुसरा स्टॉक म्हणून डीलर्सनी या सिमेंट स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दिला. डीलर्सना या स्टॉकमध्ये 1100 रुपयांची लेव्हल येण्याची अपेक्षा आहे. डीलर्सनी या स्टॉकमध्ये POSITIONAL BUY चा सल्ला दिला आहे. यामध्ये आज ओपन इंटरेस्ट 9 टक्के दिसला आहे आणि फ्रेश लाँग्स दिसला आहे. (Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
  Published by:Pravin Wakchoure
  First published: