• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • MahaTransco Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये 40 जागांसाठी भरती; या लिंकवर करा अप्लाय

MahaTransco Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये 40 जागांसाठी भरती; या लिंकवर करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  सातारा, 29 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी सातारा (Maharashtra State Electricity Transmission Company) इथे लवकरच तब्बल 40 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MahaTransco Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) (Apprentice – Electrician in EVH O&M Division Karad) - एकूण जागा 40 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) (Apprentice – Electrician in EVH O&M Division Karad) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र डाक विभाग भरती: 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी तब्बल 257 जागा रिक्त काही महत्त्वाच्या सूचना उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शगीक्षां पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. दहावी गुणपत्रिकेवर असलेलं नाव आणि आधारकार्डवरील नाव सुसंगत असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना दहावी आणि ITI च्या सर्व सेमिस्टर्सच्या मार्कशीट्स अपलोड करणं बंधनकारक असणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना सर्व माहिती योग्यरीत्या भरणं आवश्यक असणार आहे. अर्ज करताना आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी देणं आवश्यक असणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक इयत्ता दहावीची गुणपत्रिका ITI च्या सर्व सेमिस्टर्सच्या गुणपत्रिका ओळखपत्र, आधारकार्ड जातीचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला दोन पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE MahaTransco Recruitment 2021
  या पदांसाठी भरती अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) (Apprentice – Electrician in EVH O&M Division Karad) - एकूण जागा 40
  शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यक इयत्ता दहावीची गुणपत्रिका ITI च्या सर्व सेमिस्टर्सच्या गुणपत्रिका ओळखपत्र, आधारकार्ड जातीचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला दोन पासपोर्ट साईझ फोटो
  शेवटची तारीख  11 नोव्हेंबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: