Home /News /mumbai /

Anil Deshmukh resign अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Anil Deshmukh resign अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

'आज देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे, पण ही नैतिकता पहिल्या दिवशीच आठवायला हवी होती'

    मुंबई, 05 एप्रिल : 'सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरण, मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरण आणि आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh resigned) यांनीही गृहमंत्रिदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात एवढ्या भयानक घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत का नाहीत, त्यांचे मौन अस्वस्थ करणारं आहे' अशी खोचक टीका भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. Weather Update Today: विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा तर मुंबईत पावसाचं वातावरण परमबीर सिंग यांनी जे काही आरोप केले होते. त्याबद्दल मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे. त्यानंतर हे अपेक्षितच होतं की राजीनामा आवश्यक होता. हा राजीनामा उशीरा झाला आहे, तात्काळ राजीनामा घ्यायला हवा होता, पण आज देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे, पण ही नैतिकता पहिल्या दिवशीच आठवायला हवी होती, असा टोला फडणवीस यांनी लगावला. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असला तरी एका गोष्टीचं मला कोडं आहे, अनेक भयानक गोष्टी राज्यात झाल्या आहे. पण तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांचं मौन अस्वस्थ करणारं आहे. सचिन वाझे काय लादेन आहे काय, ही त्यांची शेवटची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे त्यांनी आता बोललं पाहिजे, असा सणसणीत टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. कोरोना आणखी किती स्वप्नं उध्वस्त करणार? पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याचा मृत्यू तर दुसरीकडे, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गंभीर आरोप केला आहे. 'नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. CBI ने तातडीने आवश्यक कारवाई करावी' अशी मागणीच त्यांनी केंद्राकडे केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Anil deshmukh, Devendra Fadnavis, Hiren mansukh, Resignation, Sachin vaze, Uddhav Thackery

    पुढील बातम्या