मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

स्वप्नांना लागली कोरोनाची नजर! पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभवचा Covid ने घेतला बळी

स्वप्नांना लागली कोरोनाची नजर! पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभवचा Covid ने घेतला बळी

वैभव हा मूळचा श्रीगोंदा तालुक्यातील होता. गेली काही वर्षं तो स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात राहात होता.

वैभव हा मूळचा श्रीगोंदा तालुक्यातील होता. गेली काही वर्षं तो स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात राहात होता.

वैभव हा मूळचा श्रीगोंदा तालुक्यातील होता. गेली काही वर्षं तो स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात राहात होता.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 05 एप्रिल: कोरोनानं (Coronavirus Pune news) पुन्हा एकदा थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून जगभराच्या मानगुटीवर बसलेल्या या कोरोनाच्या (Covid-19 latest updates) राक्षसामुळं इच्छा नसतानाही अनेक मनाला टचका लावून जाणाऱ्या घटनांचे आपण साक्षीदार बनलो आहोत. अशीच आणखी एक घटना पुण्यातून आली आहे. एमपीएससीची (MPSC student died due to covid-19 Pune) तयारी करणाऱ्या एका तरुणानं कोरोनामुळं जीव गमावल्याची ही घटना आहे. वैभव शितोळे असं या तरुणाचं नाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत खराब झाली होती. कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर तो 16 मार्च रोजी पुण्याच्या ससून रुग्णालयात (Sasoon hospital pune) दाखलही झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यानच 2 एप्रिल रोजी पहाटे त्याचं निधन झालं. वैभव हा अभ्यासात अत्यंत हुशार आणि सर्वांना प्रेरणा देणारा विद्यार्थी होता असं त्याच्या मित्रांनी सांगितलं. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याचं वैभवचं स्वप्न कोरोनामुळं अधुरं राहिल्याचं त्याच्या मित्रांनी म्हटलंय. सकाळने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

वाचा - 'संजीवनी-अ शॉट ऑफ लाईफ'Network18 आणि Federal Bankची कोरोना लसीकरण जनजागृती मोहिम

अनेक जण पॉझिटिव्ह

वैभवच्या मृत्यूनंतर त्याच्या काही मित्रांनी माध्यमांना सांगितले की, पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनामुळं स्पर्धा परीक्षांबाबतही अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांवर मोठा तणाव आहे. त्यात कोरोनाच्या संसर्गामुळं अनेक विद्यार्थ्यांना लागण झाली आहे. तणावामुळं त्यांची तब्येत अधिक खालावते असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

वाचा - या' राज्याचे आरोग्य मंत्री म्हणतात, 'कोरोना नाही, मास्क वापरु नका' पाहा VIDEO

चाचणी करण्यास टाळाटाळ

एमपीएससीची परीक्षा 11 तारखेला होत आहे. त्यामुळं अनेक विद्यार्थी तब्येत खराब असूनही किंवा कोरोनाची लक्षणं असूनही आजारपण अंगावर काढत असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाची चाचणी करून चाचणी पॉझिटिव्ह आल्यास परीक्षा देता येणार नाही आणि एवढ्या दिवसांची मेहनत वाया जाईल त्यामुळं गोळ्या खाऊन विद्यार्थी आजारपण अंगावर काढत आहेत. त्यामुळं प्रकृती खालावल्यानंतर अनेक जणांना रुग्णालयात दाखल करावं लागतंय आणि तोपर्यंत उपचाराला उशीर होतो, अशीही माहिती मिळाली आहे. कोरोनामुळं काही विद्यार्थी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत, तर काही गावी परतले आहेत. त्यामुळं परीक्षा पुढं ढकलण्याची मागणही काही विद्यार्थी करतायत.

वैभव हा मूळचा श्रीगोंदा तालुक्यातील होता. जवळपास गेली पाच ते सहा वर्षे तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. अनेक परीक्षांमध्ये त्याला यशही मिळालं होतं. काही परीक्षांमध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतींपर्यंत त्यानं मजल मारली होती. त्यामुळं स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश मिळवण्याची खात्री त्याला होती. वैभवनं सॉफ्टवेअर इंजिनीअरींग पूर्ण केल्यानंतर 2015 पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती.

First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Death, Mpsc examination, Pune, Student