मुंबई, 13 जून : मुंबईत दोन अल्पवयीन बहिणीवर शेजारीच राहणाऱ्या एका 80 वर्षाच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील व्हीबी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपी हा पीडित कुटुंबीयाच्या शेजारी राहत होता. लॉकडाउनच्या काळात पीडित कुटुंबाने माणुसकीच्या नात्याने आणि शेजारधर्म पाळत या आरोपीला खाण्या-पिण्याची व्यवस्था केली होती.
हेही वाचा-तलवारी आणि कोयत्यासह घरांवर हल्ला; लहान मुलगा जखमी, परिसरात भीतीचं वातावरण
या आरोपीचे कुटुंब हे मुळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. लॉकडाउन लागू होण्याच्या आधीच त्याने आपल्या कुटुंबाला गावी पाठवून दिले होते. परंतु, लॉकडाउन लागू झाल्यानंतर त्याला आपल्या गावी जाता आले नाही.
एकटाच राहत असल्यामुळे वयोवृद्ध असल्याचा विचार करून शेजारी राहणाऱ्या पीडितेच्या कुटुंबाने त्याला वेळोवेळी मदत केली. तक्रारदार पीडित कुटुंबीयांना एकूण सहा मुली आहे. या पैकी 12 वर्ष आणि 7 वर्षाच्या या दोन मुली या आरोपीला चहा, जेवण देण्यासाठी जात होत्या.
एकदा या दोन मुली आरोपीला चहा घेऊन त्याच्या घरी गेल्या होत्या. बराच वेळ झाला मुली बाहेर आल्या नव्हत्या. त्यावेळी शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीने आरोपीच्या घरात डोकावून पाहिले तर संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर शेजाऱ्याने आरडाओरडा करून पीडितेच्या कुटुंबीयांना माहिती दिली. घडलेला प्रकार पाहून पीडित मुलीच्या कुटुंबीयांना एकच हादरा बसला.
हेही वाचा-मोठा कट उधळला, रात्रभरापासून सुरू असलेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार
पीडित मुलींच्या आईने थेट व्हीबी नगर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.