श्रीनगर, 13 जून : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं तीन ठिकाणी दहशतववाद्यांवर हल्ला केला आहे. पुलवामा, कुलगाम आणि अनंतनाग सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अनंतनागमध्ये दोन आणि कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. सध्या या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. आठवड्याभरात 14 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश मिळालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामाच्या गुलाब बाग तिरळ, कुलगामच्या निपोरा आणि अनंतनागच्या लल्लान भागात दहशतवाद्यांकडून मोठा कट रचला जात असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या मदतीनं कारवाई केली. सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
#UPDATE — Two unidentified terrorists have been neutralised in the ongoing encounter. Search underway. Further details shall follow: Kashmir Zone Police https://t.co/DZyZnKNKpp
अनंतनाग आणि कुलगाम सेक्टरमध्ये प्रत्येकी दोन दहशतवादी ठार करण्यात जवानांना यश मिळालं आहे. तर 3 दहशतवादी गुलाब बाग तिरल येथील एका घरात लपल्याची माहिती आहे. दोन्ही बाजूंकडून सतत गोळीबार सुरू आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या शोपियान येथे दहशतवाद्याच्या अटकेची माहिती मिळाली आहे.