Home /News /crime /

तलवारी आणि कोयत्यासह घरांवर हल्ला; लहान मुलगा जखमी, परिसरात भीतीचं वातावरण

तलवारी आणि कोयत्यासह घरांवर हल्ला; लहान मुलगा जखमी, परिसरात भीतीचं वातावरण

शहरात लॉकडाऊन शिथिल होताच गुन्हेगारी फोफावल्याचे दिसून येत आहे.

नाशिक, 13 जून : नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुंडांनी हैदोस घातल्याची घटना घडली आहे. देवळाली गाव परिसरातील सुंदर नगर भागातील ही घटना आहे. तलवारी आणि कोयत्याने घरासह वाहनांची तोडफोड केली आहे. धक्कादायक म्हणजे या सगळ्या प्रकारात एक लहान मुलगा जखमी झाला आहे. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. शहरात लॉकडाऊन शिथिल होताच गुन्हेगारी फोफावल्याचे दिसून येत आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेत 30 ते 35 वाहनांचं नुकसान झालं आहे. दहा ते बारा घराचंही नुकसान झाले आहे. यामध्ये चार संशयित आरोपींना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीदेखील नाशिक जिल्ह्यात चोरी करण्यासाठी चोरट्यांनी एका घरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक महिला ठार झाली होती, तर तीचा मुलगा गंभीर जखमी झाला. जिजाबाई जोंधळे असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून हल्ल्यात संदीप जोंधळे हा जखमी झाला होता. त्याला मालेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेही वाचा - भर रस्त्यात पळवून पळवून घातल्या गोळ्या, फिल्मी स्टाईल मर्डर पाहून गाव हादरलं दरम्यान, नाशिकसह नागपुरातही लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. प्रत्येक दिवशी हत्येच्या नव्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Nashik

पुढील बातम्या