Home /News /mumbai /

'पुजारी त्यांना केलं, कारण आपल्याला देव व्हायचंय'; तो व्हिडिओ शेअर करत मिटकरींचा फडणवीसांना टोला?

'पुजारी त्यांना केलं, कारण आपल्याला देव व्हायचंय'; तो व्हिडिओ शेअर करत मिटकरींचा फडणवीसांना टोला?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी १०५ आमदारांचा पाठिंबा असूनही मुख्यमंत्री न होता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं सगळेच विचारात पडले. यानंतर राजकीय पक्षांनीही यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे

    मुंबई 01 जुलै : राज्याच्या राजकारणात मागील 8 ते 10 दिवसांपासून हालचालींना वेग आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (Shivsena) 39 आणि 11 अपक्ष असे एकूण 50 आमदारांसह बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गट मिळून सरकार स्थापन करण्यासाठी पुढे आले. मात्र यावेळी देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्रीपद सांभाळतील, असाच सर्वांचा अंदाज होता. मात्र, ऐनवेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) असतील, अशी घोषणा केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला . शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; निलंबनाच्या कारवाईबाबतची शिवसेनेची ती याचिका फेटाळली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी १०५ आमदारांचा पाठिंबा असूनही मुख्यमंत्री न होता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं सगळेच विचारात पडले. यानंतर राजकीय पक्षांनीही यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari Tweet) यांनीही एका जुन्या मराठी चित्रपटातली एक व्हिडिओ क्लिप शेअर करत सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत सूचक ट्विट केलं आहे. याचा रोख थेट फडणवीस आणि भाजपच्या दिशेनं असल्याचं बोललं जात आहे. ही क्लिप एका जुन्या मराठी चित्रपटातील असून या व्हिडिओमध्ये सदाशिव अमरापूरकर एका राजकारण्याच्या भूमिकेत आहेत. यात दिसतं की त्यांचा दुसऱ्या पात्राशी संवाद सुरू आहे. यात त्या दुसऱ्या पात्रानं अमरापूरकरांनी बांधलेल्या एका मंदिराचा उल्लेख करून त्यांना सवाल केला की. “मोठा घोळ केला तुम्ही. एवढं झकास देऊळ बांधलं आणि त्याचा पुजारी अण्णा बाळाला केला”. 'शिवसैनिकाला' मुख्यमंत्री करण्याबाबत राऊतांनी दिलं उत्तर, फडणवीसांना विचारला सवाल यावर अमरापूरकर यांनी दिलेली प्रतिक्रिया हीच भाजपची सध्याची रणनीती असल्याचं सुचवण्याचा प्रयत्न मिटकरी यांनी केला आहे. या पात्राच्या प्रश्नावर उत्तर देत अमरापूरकर म्हणतात, की 'पुजारी अण्णा बाळाला केला, कारण आपल्याला देव व्हायचंय. यालाच राजकारण म्हणतात. आपलं आपणच पागोटं डोक्यावर ठेऊन घ्यायचं नसतं. दुसऱ्याला ठेवायला द्यायचं असतं. म्हणजे ठेवणाराही खूश आणि घालून घेणाराही खूश'. सध्याच्या राजकीय घडमोडींशी याचा संबंध लावला जात आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, State government

    पुढील बातम्या