Home /News /mumbai /

शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; निलंबनाच्या कारवाईबाबतची शिवसेनेची ती याचिका फेटाळली

शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; निलंबनाच्या कारवाईबाबतची शिवसेनेची ती याचिका फेटाळली

उद्या होणारी ही बहुमत चाचणी रोखण्याची मागणी शिवसेनेकडून याचिकेत करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे.

    मुंबई 01 जुलै : सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उद्या म्हणजेच शनिवारी भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. मात्र, याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयाला धाव घेतली होती. उद्या होणारी ही बहुमत चाचणी रोखण्याची मागणी शिवसेनेकडून याचिकेत करण्याता आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. नव्या सरकारचं टेन्शन वाढलं! बहुमत चाचणी थांबवा, शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला दिलासा तर शिवसेनेला धक्का दिला आहे. सर्व खटल्यांची सुनावणी 11 जुलै रोजीच घेणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. तसंच आता तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच न्यायालयाने नकार दिला आहे. सुनील प्रभू यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. आमदारांना विधानसभेत येण्यापासून रोखण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. उद्या होणारी बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी, यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. शिवसेनेनं नव्या सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत ११जुलैची सुनावणी आजच घेण्याची मागणीही केलेली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळत शिवसेनेला धक्का दिला आहे. मोठी बातमी : राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट, फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये झाली मध्यरात्री खलबतं शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणून शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (Shivsena) 39 आणि 11 अपक्ष असे एकूण 50 आमदारांसह बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर आता शिंदे सरकारला उद्या म्हणजेच शनिवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं गेलं आहे
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Supreme court

    पुढील बातम्या