मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अजितदादांची CBI चौकशीची मागणी हा भाजपचा 'प्लॅन B', संजय राऊतांचा हल्लाबोल

अजितदादांची CBI चौकशीची मागणी हा भाजपचा 'प्लॅन B', संजय राऊतांचा हल्लाबोल

‘अविनाश भोसले यांची मालमत्ता ‘ईडी’कडून सील हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे काय?’ कारवाई सरळ मार्गाने व्हावी, पण ईडी हे सर्व भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे'

‘अविनाश भोसले यांची मालमत्ता ‘ईडी’कडून सील हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे काय?’ कारवाई सरळ मार्गाने व्हावी, पण ईडी हे सर्व भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे'

‘अविनाश भोसले यांची मालमत्ता ‘ईडी’कडून सील हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे काय?’ कारवाई सरळ मार्गाने व्हावी, पण ईडी हे सर्व भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे'

मुंबई, 27 जून : भारतीय जनता पक्षाच्या (bjp) राज्य कार्यकारिणी बैठकीत अजित पवार (ajit pawar) व अनिल परब (anil parab) यांची सीबीआय (cbi) चौकशी करा आणि त्यासाठी आधार काय? तर जो अधिकारी आरोपी असून अटकेत आहे त्याने बेछूट आरोप केलेले पत्र. आरोपी म्हणून अटकेत असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्राच्या आधारावर सीबीआय चौकशीची मागणी कशी केली जाऊ शकते? असा संतप्त सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay) यांनी उपस्थितीत केला.

भाजपच्या कार्यकारी बैठकीमध्ये अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मांडण्यात आल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा पेटले आहे. याच मुद्यावरून संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना कोण ओळखत नाही! त्यांच्या भ्रष्टाचारविरुद्ध चळवळीने भल्याभल्यांची झोप उडवली. दमानिया यांनी सांगितले आहे की, ‘अविनाश भोसले यांची मालमत्ता ‘ईडी’कडून सील हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे काय?’ कारवाई सरळ मार्गाने व्हावी, पण ईडी हे सर्व भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे. दमानियांचे म्हणणे असे, ‘‘अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहीत आहे.

आजचं राशीभविष्य : प्रत्येक राशीच्या व्यक्तीला करावा लागणार अडचणीचा सामना

भोसले यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई म्हणजे भाजप किंवा केंद्राकडून ‘ईडी’ला मिळालेला आदेश आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा वापर राजकीय कारणांसाठी होताना दिसत आहे.’’ अंजली दमानिया पुढे सांगतात ते अत्यंत महत्त्वाचे, ‘‘सध्याच्या घडीला शिवसेनेसोबत ‘प्लॅन ए’प्रमाणे बोलणी सुरू असतील तर ‘प्लॅन बी’ तयार असावा यासाठी ते अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हे सर्व किळसवाणे राजकारण आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळालीच पाहिजे हे त्यांचे ध्येय आहे!’’ अशी टीका राऊत यांनी केली.

Sankashti Chaturthi : रवीवती संकष्टी चतुर्थीचा योग; काय आहे याचं महत्त्व?

महाराष्ट्र विधानसभेचे एक सदस्य प्रताप सरनाईक हे गेल्या पाच महिन्यांपासून परागंदा आहेत. ‘ईडी’चे तपास अधिकारी त्यांच्या मागे हात धुऊन लागले. सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांना या सर्व प्रकरणात मनस्ताप सुरू आहे. सरनाईक यांनी एक पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले व राजकारणात खळबळ उडवली. सरनाईक हे शिवसेनेचे आमदार. मुख्यमंत्री शिवसेनेचे. तरीही त्यांनी हे पत्र लिहिले. सरनाईक यांना सुरुवातीला ‘ईडी’चे समन्स आले तेव्हा भाजप व ईडीच्या अन्यायाशी शेवटपर्यंत लढेन असे त्यांनी सांगितले. अर्णब गोस्वामीविरुद्ध हक्कभंग आणून खळबळ माजवणारे सरनाईक असे हतबल का झाले? आमदार सरनाईक यांचा त्रागा मुख्यमंत्र्यांना असे टोकाचे पत्र लिहिण्यापर्यंत का गेला? ‘‘माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियांचाही छळ सुरू आहे, तो थांबवा!’’ हे त्यांचे म्हणणे, असं राऊत यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Samana, Shivsena