मुंबई, 27 जून : दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (Sankashti Chaturthi) अनेक भाविक चतुर्थीचं व्रत करतात. हिंदू पंचांगानुसार (Hindu Pancheng) आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. या संकष्ट चतुर्थीचं व्रत सूर्योदयापासून सुरू होतं आणि चंद्रोदयानंतर अर्ध्या दिल्यानंतर संपतं. यावेळी रविवारी 27 जूनला कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी आहे. ज्या लोकांच्या जन्म पत्रिकेमध्ये सूर्य (Sun) कमजोर आहे. त्यांनी रवीवती संकष्टी चतुर्थीचं (Ravivati Sankashti Chaturthi) व्रत करणं लाभदायक ठरू शकतं. या दिवशी पूर्ण दिवस उपवास (Fasting) करावा. फळं, पाणी, दूध, फळांचा रस घ्यावा. चंद्राच्या दर्शनानंतर व्रत सोडावं. रवीवती संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त रविवारी 27 जूनला आषाढ महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला संध्याकाळी 03.54 मिनिटांनी ही चतुर्थी सुरू होऊन 28 जूनला सोमवारी 02.16 पर्यंत हा चतुर्थीचा योग असणार आहे. संकष्ट चतुर्थीचं व्रत 27 जूनला असेल. या दिवशी 09.05 मिनिटांनी चंद्रोदय होईल मात्र, त्यानंतर देखील 28 जून सोमवारपर्यंत रवीवती संकष्टी चतुर्थीचं व्रत असेल. ( Chanakya Niti: लोकांना प्रमाणापेक्षा जास्त बदलण्याची चूक करू नका; वाढतील शत्रू ) विघ्नहर्ता गणपती चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणपतीचं व्रत केलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते आणि चंद्राला अर्ध्य दिलं जातं. अर्ध्य दिल्यानंतरच हा उपवास पूर्ण होतो. चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आयुष्यामधील संकट संपतात आणि सुखसमृद्धी, धनसंपत्ती वाढते अशी मान्यता आहे. कसं करावं व्रत रवीवती चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं. सूर्योदयापूर्वी स्नान करून जल अर्पण करावं. यावेळी ‘ओम सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा. त्यानंतर गणेशाच्या मूर्तीला मध आणि पाण्याने स्नान करावं. व्रताचा संकल्प करावा. मूर्तीची स्थापना करून धूपदीप दाखवावा. गणपतीला शेंदूर लावावा, दुर्वा, फुलं, तांदूळ अर्पित करावीत नैवेद्य ठेवावा आणि ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. सहकुटुंब गणपतीची आरती करावी आणि गणपती बाप्पाच्या चरणावर फुल अर्पण करावीत. ( तुटलेली हाडं जोडणारं हनुमान मंदिर; कुठे आहे माहिती आहे? ) (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







