मुंबई, 11 फेब्रुवारी : राज्यात पुढील काळामध्ये दोन उपमुख्यमंत्री आणि काही खात्यांमध्ये अदलाबदल होणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पण, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अशी कोणतीही चर्चा नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी स्पष्ट केलं. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार होता. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी सरकारमधील खातेवाटपाचा प्रश्न विचारला असता या बातम्या मीडियातील आहेत, तुमचे सोर्स नेमके काय हे मला काही माहिती नाही, असा खुमसदार टोलाही अजितदादांनी लगावला. मोठी बातमी, उदयनराजे घेणार शरद पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण ‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भविष्यात मंत्रिपद मिळेल तसंच काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देत विधानसभा अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल, अशी चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी भाष्य करताना म्हणाले की, ‘थोडीशी नव्हे. तसूभरही चर्चा नाही. त्यामुळे नेमकी ही चर्चा कुठे आहे, ते मला कळू शकणार नाही’ असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला. खातेवाटप हा अधिकार तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा आहे. तिन्ही नेते यासंदर्भाचा निर्णय घेतील आणि हा निर्णय तिन्ही पक्षाला मान्य असेल. पण राज्यस्तरावर काम करणारे माझे सहकारी बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, जयंत पाटील, भुजबळसाहेब, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यापैकी आमच्या कुणाच्या कानावर खातेवाटपाबाबत अशी बातमी नाही, असेही अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. ‘या’ विद्यापीठात अॅडमिशन घेऊन दिलं नाही म्हणून पत्नीनं मागितला घटस्फोट! नाना पटोले यांनी पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्था मतपत्रिकाद्वारे मतदान व्हावे ,अशी भूमिका मांडली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र ईव्हीएम वर विश्वास दाखवला आहे. ‘नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची भूमिका मांडली होती. मोठ्या मतांनी जिंकून आलो की ईव्हीएमचा दोष नसतो. पण पराभव झाला की मला दोष द्यायचा. माझा ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.