मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी, उदयनराजे घेणार शरद पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

मोठी बातमी, उदयनराजे घेणार शरद पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच

विधानसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच

विधानसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच

सातारा, 11 फेब्रुवारी : राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये दाखल झालेले राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) तब्बल वर्षभरानंतर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेणार आहे. नवी दिल्लीत ही भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच उदयनराजे हे शरद पवार यांची भेट घेणार आहे.  शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास ही भेट होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी दिल्लीत भेट घेतली होती. यावळी उदयनराजेंनी नाना पटोले यांचं अभिनंदन केलं होतं. पण, उदयनराजे आणि नाना पटोले यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला उदयनराजे पोहोचणार आहे. विशेष म्हणजे, भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करण्याचे टाळले होते.  शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेला फोटो फेसबुक पेजवर अपलोड करून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. ‘आदरणीय शरद पवार यांना 80 व्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा,आपणास दीर्घायुष्य लाभो’,अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या होत्या. संपूर्ण वर्षभरात दोन्ही नेत्यांमधील एवढाच तो संवाद होता. आता मराठा आरक्षणाच्या निमित्तान दोन्ही नेते भेटणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: NCP, उदयनराजे भोसले, शरद पवार

पुढील बातम्या