मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /भाजपला आणखी एक धक्का, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे नगरमध्ये खळबळ

भाजपला आणखी एक धक्का, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे नगरमध्ये खळबळ

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठी गळती लागली होती. राष्ट्रवादीतील अनेक नेते हे भाजपमध्ये दाखल झाले होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठी गळती लागली होती. राष्ट्रवादीतील अनेक नेते हे भाजपमध्ये दाखल झाले होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठी गळती लागली होती. राष्ट्रवादीतील अनेक नेते हे भाजपमध्ये दाखल झाले होते.

मुंबई, 16 मार्च : जळगाव महापालिकेत (Jalgaon municipal corporation) शिवसेनेनं (Shivsena) जोरदार धक्का दिल्यानंतर आता अहमदनगरमध्ये  (Ahamadnagar) सुद्धा भाजपला (BJP) आणखी एक धक्का बसला आहे. अहमदनगर जिल्हा बँकेचे (Ahmednagar District Bank) माजी अध्यक्ष सीताराम गायकर (Seetaram Gaikar) हे राष्ट्रवादी (NCP)काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठी गळती लागली होती. राष्ट्रवादीतील अनेक नेते हे भाजपमध्ये दाखल झाले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी मधुकर पिचड यांनीही आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मधुकर पिचड यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला होता. पण, आता नगरमध्ये पिचड यांच्या साम्राज्याचा खालसा करण्यास राष्ट्रवादीने पाऊल टाकले आहे.

रिया चक्रवर्तीच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या, हायकोर्टाने जामीन दिला पण...

अहमगदनगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत गायकर प्रवेश करणार आहे. यावेळी अकोले अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे 11 संचालक देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे,  गायकर हे मधुकर पिचड यांच्यासोबत भाजपात गेले होते.

आता गायकर पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी करणार आहे. त्यामुळे पिचड यांची कारखान्यात कोंडी होणार आहे. अगस्ती कारखान्यातील सत्ता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

कुत्र्यांच्या पिल्लांसाठी 'चिल्लर पार्टी'चा रास्ता रोको, हृदयस्पर्शी घटना

दरम्यान, दुसरीकडे जळगावमध्ये जळगाव महापालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक येत्या 18 मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपला शिवसेनेनं 27 नगरसेवक फोडून सुरूंग लावला आहे. जळगाव महापालिकेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत्य विश्वासू सहकारी आणि राज्य भाजपचे संकटमोचक हनुमान म्हणून ज्यांची ओळख आहे असे गिरीष महाजन यांच्यावर आहे.

शेअर बाजारात तेजी : या आठवड्यात 5 नवे IPO; गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या वैशिष्ट्ये

पण आता महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपचे बहुमत संख्याबळ शिवसेनेनं राजकूय सर्जीकल स्ट्राईक करत उद्धवस्त केले आहे. जळगाव महापालिकेचे शिवसेनेनं फोडलेले सर्व 27 नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच गिरीष महाजनांचा राजकीय पराभव करून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच दे धक्का देण्याची रणनीती शिवसेनेनं आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, BJP