मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /शेअर बाजारात तेजी : या आठवड्यात येणार 5 IPO; गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

शेअर बाजारात तेजी : या आठवड्यात येणार 5 IPO; गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

सध्या शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. याचाच लाभ घेण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच कंपन्या शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या पाच कंपन्यांचे आयपीओ या आठवड्यात शेअर बाजारात दाखल होणार आहेत.

सध्या शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. याचाच लाभ घेण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच कंपन्या शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या पाच कंपन्यांचे आयपीओ या आठवड्यात शेअर बाजारात दाखल होणार आहेत.

सध्या शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. याचाच लाभ घेण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच कंपन्या शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या पाच कंपन्यांचे आयपीओ या आठवड्यात शेअर बाजारात दाखल होणार आहेत.

मुंबई, 16 मार्च: सध्या शेअर बाजारात (Share Market) तेजीचे वातावरण आहे. याचाच लाभ घेण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच कंपन्या शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या पाच कंपन्यांचे आयपीओ (IPO) या आठवड्यात शेअर बाजारात दाखल होणार आहेत. या पाच कंपन्या आयपीओच्या माध्यमातून तब्बल 3764 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची अपेक्षा आहे. सोमवारी 15 मार्च रोजी क्राफ्ट्समन ऑटोमेशन आणि लक्ष्मी ओर्गेनिक्सचा आयापीओ येणार आहे, तर मंगळवारी 16 तारखेला कल्याण ज्वेलर्सचा, बुधवारी 17 तारखेला सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि ऑनलाईन गेमिंग कंपनी नजारा टेक्नोलॉजीजचा आयपीओ दाखल होणार आहे. या कंपन्यांचे शेअर्स मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदवले जातील.

क्राफ्ट्समन ऑटोमेशन (Craftsman automation) : ऑटोमेकर क्राफ्ट्समन ऑटोमेशन 824 कोटी रुपयांचा आयपीओ आणत असून 150 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि 45 लाख 21 हजार 450 शेअर्स कंपनीचे प्रवर्तक ऑफर फॉर सेल अंतर्गत विकत आहेत. कंपनीच्या आयपीओचा किंमत पट्टा 1488 -1490 रुपये आहे. हा इश्यू खुला झाला असून तो 17 मार्च रोजी बंद होणार आहे.

लक्ष्मी ओर्गेनिक्स (Laxmi Organics) : लक्ष्मी ओर्गेनिक्सचा आयपीओ 15 मार्चला दाखल झाला असून 17 मार्चला बंद होणार आहे. या कंपनीचे प्रवर्तक यलो स्टोन 300 कोटींचे फ्रेश शेअर आणि 300 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल जारी करणार आहेत. या शेअरची किंमत 129-130 च्या दरम्यान आहे.

कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewelers) : कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ 16मार्च रोजी खुला होणार असून तो 18 मार्च रोजी बंद होईल. कंपनी याद्वारे 1175 कोटी रुपये गुंतवणार आहे. कंपनीनं आपल्या शेअरची किंमत 86-87 रुपयांच्या पत्त्यात ठेवली आहे. कल्याण ज्वेलर्समध्ये वॉरबर्ग पिनकसची गुंतवणूक आहे. याआधी कंपनीनं 1750 कोटी रुपयांचा इश्यू आणण्याची तयारी केली होती. मात्र बाजाराची स्थिती बघता 1175 कोटींचा इश्यू आणण्याचा निर्णय घेतला. आयपीओ अंतर्गत कंपनी 800 कोटींचे फ्रेश शेअर्स तर 375 कोटींचे शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये खुले करणार आहे.

(हे वाचा: WhatsApp Update: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही पाहता येणार Instagram Reels   )

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank) : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ 17 मार्च रोजी खुला होणार असून 19मार्च रोजी बंद होणार आहे. कंपनी 81 लाख 50 हजार शेअर्स फ्रेश इश्यूमध्ये तर 1 कोटी 9 लाख 43 हजार 70 शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी खुले करणार आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत 303-305 रुपयांच्या मध्ये आहे.

नजारा टेक (Nazara Tech) : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Zunzunwala) यांची गुंतवणूक असलेली नजारा टेकचा आयपीओ 17 मार्चला खुला होणार असून 19 मार्च रोजी बंद होईल. कंपनीच्या शेअरची किंमत 1100-1101 रुपयांच्या दरम्यान आहे. वरच्या किमतीनुसार कंपनी 583 कोटीरुपये मिळवू शकते. या कंपनीचे 52.9 लाख शेअर्स प्रवर्तक आणि शेअर धारक विकत आहेत. झुनझुनवाला यांची या कंपनीत सप्टेंबर 2020 पर्यंत 11.51 टक्के भागीदारी होती. कंपनीचा विस्तार भारताशिवाय आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतही आहे.

First published:
top videos

    Tags: Business News, Investment, Money, Share market, Technology