मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /रिया चक्रवर्तीच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या, हायकोर्टाने जामीन दिला पण...

रिया चक्रवर्तीच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या, हायकोर्टाने जामीन दिला पण...

Sushant Singh Rajput Case: या महिन्यातच एनसीबीने (NCB) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये 33 लोकांची नाव दाखल केली होती. त्यामध्ये रिया आणि तिचा भाऊ शोविक यांचं नाव देखील होतं

मुंबई, 16 मार्च: सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death Case) प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)  जामीन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अडचणीत सापडू शकते. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने बॉम्बे हायकोर्टाच्या (Bombay High Court) रियाला जामीन देण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान दिले आहे. या प्रकरणी गुरुवारी सुनावणी होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रियाला मुंबई हायकोर्टाने 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजुर केला होता. पण हायकोर्टाच्या जामिनानंतर एनसीबीने सुप्रीम कोर्टात या निर्णयाला आव्हान दिल्याने रियाच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

या महिन्यात एनसीबीने मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात 33 जणांचे नाव समाविष्ट केले आहे. या आरोपपत्रात रिया आणि तिचा भाऊ शोविक यांचेही नाव आहे. कोर्टासमोर सादर झालेल्या 12 हजार पानांच्या आरोपपत्रात 200 हून अधिक साक्षीदारांची निवेदने नोंदविण्यात आली आहेत. रियावर ड्रग सिंडिकेटची सक्रिय सदस्य असल्याचा आरोप आहे. मात्र रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी एनसीबीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

(हे वाचा-Sachin Vaze अटक प्रकरणाला नवे वळण, फक्त वाझेंच्या घराचे फुटेज का केले गायब?)

गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. या घटनेची पाळमुळं थेट बॉलिवूडमधील ड्रग प्रकरणापर्यंत पोहोचली होती. याच केसमध्ये अभिनेत्री आणि सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला 8 सप्टेंबर रोजी एनसीबीने अटक केली होती. सुशांतला ड्रग आणून दिल्याचा आरोप रियावर होता. यानंतर उच्च न्यायालयाने साधारण महिनाभराने तिला जामीन दिला होता. हायकोर्टाने जामीन देताना असे म्हटले होते की, 'ती ड्रग डीलर्सच्या साखळीचा भाग नाही.'

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Rhea chakraborty, Sushant Singh Rajput, The Bombay High Court