मुंबई, 06 फेब्रुवारी : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वरळी मतदारसंघावरून कलगीतुरा रंगला आहे. मी, चॅलेंज दिल्यानंतर सगळीच यंत्रणा कामाला लागली. ट्वीटमुळे हिला दिया ना, हिंमत नव्हती तर तसं सांगायचं असतं, ट्वीट करून सांगण्यात काय अर्थ होता? असा टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला.
तुमच्यामध्ये हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीमधून निवडणूक लढवून दाखवा असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं. त्यानंतर शिंदे गटाने जोरदार पलटवार केला.
(आधी कुलकर्णी, आता टिळक पुढचा नंबर...,भाजपच्या खेळीमुळे ब्राम्हण समाज नाराज, कसब्यात बॅनरबाजी)
'40 लोकांनी कुठूनही राजीनामा द्यावा, वरळीत येत आहे तर समोर लढण्याचे मन बघतायत का बघूया. परवा चॅलेंज दिल्यानंतर काल वरपासून खालपर्यंत हिल गये है. एक नक्की आहे की, हिला दिया. मी आव्हान केल्यानंतर ट्वीटरवर भाजपच्या लोकांनी मला ट्वीट करून ट्रोल केलं. एवढ्या सगळ्यांनी ट्विट करण्यापेक्षा स्वत: सांगितले असते की, लढण्याची ताकद नाही तर आम्ही समजून घेतलं असतं, असा उपरोधक टोला आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला.
(चिंचवडमध्ये मविआचा उमेदवार ठरेना, राहिला फक्त एकच दिवस, इच्छुक गॅसवर)
शासनाच्या जाहिराती किती निघाल्या आहेत बघा. त्यातील निम्या तरी घोषणा पूर्ण झाल्या आहेत का, हे सुद्धा पाहावे लागणार आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाा. 'नाणार प्रकल्प करण्याआधी तिथल्या जनतेच्या भावना समजून घ्यायला हवे. नाणारच्या अवतीभोवती ज्यांनी जमीन घेतल्या त्यांची नाव जाहीर करावी' असं आव्हानच राऊत यांनी केली.
'कॉंग्रेस पक्षातला अंतर्गत प्रश्न असला तरी बाळासाहेब थोरात एक ज्येष्ठ नेते आहेत. ते कोणत्या भूमिकेतून बोलतात. माहित नाही. केंद्रातील कॉंग्रेसचे नेतृत्वाने या संदर्भात माझा सल्ला मागितला आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना किळसवान राजकारण झालं. पोटनिवडणुका लढवल्या जातील. महाविकास आघाडी निवडणुका एकत्र लढवणार आहे, वंचित आघाडी अजुनही महाविकास आघाडीमध्ये नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, शिवसेना