मराठी बातम्या /बातम्या /पुणे /आधी कुलकर्णी, आता टिळक पुढचा नंबर...,भाजपच्या खेळीमुळे ब्राह्मण समाज नाराज, कसब्यात बॅनरबाजी

आधी कुलकर्णी, आता टिळक पुढचा नंबर...,भाजपच्या खेळीमुळे ब्राह्मण समाज नाराज, कसब्यात बॅनरबाजी

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता बापटांचा नंबर आहे का?

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता बापटांचा नंबर आहे का?

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता बापटांचा नंबर आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 06 फेब्रुवारी : पुण्यात कसबा पोटनिवडणुकीमुळे भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. तर दुसरीकडे, ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी नाकारल्यामुळे ब्राह्मण समाज नाराज झाला आहे. आधी कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा का? असे बॅनर पुण्यात लावण्यात आले आहे.

कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रासनेंच्या उमेदवारीवरून शैलेश टिळक नाराज झाले आहे. ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला तिकीट नाकारले जात असल्यामुळे ब्राम्हण महासंघानेही नाराजी व्यक्त केली आहे.

(...तर पहिली गोळी झेलायला तयार, विनायक राऊत थेट बोलले, काय आहे कारण?)

आज कसब्यात एका मतदाराने बॅनर लावून आपली नाराजी बोलून दाखवली. कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता बापटांचा नंबर आहे का? समाज कुठवर सहन करणार ? असा सवाल या बॅनरमधून करण्यात आला आहे.

('टिळकांवर अन्याय, ब्राह्मण नाराज', हिंदू महासंघ कसबा लढण्याच्या तयारीत, भाजपचं टेन्शन वाढणार?)

दरम्यान, कसब्याच्या उमेदवारीवरून हिंदू महासंघाने थेट भाजपलाच सुनावलं आहे. 'जगताप कुटुंबाला न्याय आणि टिळक कुटुंबावर अन्याय करण्यात आला आहे. आधी मेधा कुलकर्णी, नंतर देवेंद्र फडणवीस आणि आता टिळक कुटुंबाला संधी नाकारणं म्हणजे भाजपला काही जातींची फक्त मतं हवी असतात. त्या जाती नको असतात. पक्षाचं काम करणं हे जेव्हा हेटाळणीचं असायचं. लोक चिडवायचे तेव्हा ज्यांनी पक्ष वाढवला त्यांनाच खड्ड्यात ढकललं जात आहे,' असा आरोप हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी केला आहे.

'खुल्या प्रवर्गाचा आवाज दाबण्याचा आज पुन्हा प्रयत्न झाला आहे. सर्वच जातींना योग्य प्रतिनिधीत्व मिळालं पाहिजे, याच भावनेतून हिंदू महासंघ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कसबा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ,' असं आनंद दवे म्हणाले आहेत.

First published:
top videos