मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आदर पुनावाला यांचे देशासाठी मोठे योगदान, सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे सरकारला आदेश

आदर पुनावाला यांचे देशासाठी मोठे योगदान, सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे सरकारला आदेश

पुढील सुनावणीत राज्य सरकारनं यावर सविस्तर अहवाल सादर करावा, असं हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

पुढील सुनावणीत राज्य सरकारनं यावर सविस्तर अहवाल सादर करावा, असं हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

पुढील सुनावणीत राज्य सरकारनं यावर सविस्तर अहवाल सादर करावा, असं हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 27 मे: कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी सिरम संस्थेनं (serum institute) कोरोना लस (Coronavirus Vaccine) निर्मिती केली. पण, आदर पुनावाला  (Adar Poonawalla) यांनी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) या प्रकरणी आदर पुनावाला यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहे.

आदर पुनावाला यांना मिळालेल्या कथित धमक्यांबाबत अॅड. दत्ता माने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

या महिलेमुळं लक्ष्मीकांत बेर्डे झाले सुपरस्टार; कॉमेडी किंगचे न ऐकलेले किस्से

सिरम इंस्टिट्युटच्या आदर पुनावाला यांनी देशासाठी सध्याचा काळात खूप मोठ योगदान दिले आहे. त्यामुळे अश्या व्यक्तीला जर धमक्या येत असतील तर ते फार गंभीर प्रकरण आहे, याची तातडीनं दखल घ्यायला हवी, असे परखड मत हायकोर्टाने नोंदवले.

जर या याचिकेतील दाव्यांत तथ्य असेल तर पुनावाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ सुरक्षा पुरवायला हवी, असे आदेशही हायकोर्टाने राज्य सरकारला दिले.

HBD: वडिलांकडून मिळाला अभिनयाचा वारसा, पाहा आशितोष गोखलेच्या काही खास गोष्टी

पुढील सुनावणीत राज्य सरकारनं यावर सविस्तर अहवाल सादर करावा, असं हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

काय आहे धमकीचं प्रकरण?

सीरमचे सीईओ आदर पुनावाला हे सध्या इंग्लंडमध्ये त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहेत. देशात कोरोनाच्या लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर आपल्यावर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याचं पुनावाला यांनी लंडनमध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं. कोरोनाच्या लशीसाठी देशातील अनेक बड्या व्यक्तींनी फोन करून दबाव टाकल्याचं पुनावाला यांनी सांगितलं.

फोन करण्याऱ्यांनी धमकीवजा इशारे दिल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. फोन करणाऱ्यांमध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि बड्या उद्योगपतींचा समावेश होता, असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.

'रोहितसारखं करु नकोस,' इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतला कपिल देव यांचा सल्ला

या प्रकारानंतर पुनावाला हे प्रचंड दबावात आणि घाबरलेलेही होते. या संपूर्ण प्रकारानंतर पुनावाला यांना Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. अदार पुनावाला हे जिथं कुठं असतील त्याठिकाणी त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असंही देसाई यांनी म्हटलं आहे. तसंच पुनावाला यांना कुठून फोन आले, कोणी फोन केले याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही देसाईंनी दिलं आहे.

First published: