मुंबई 27 मे: लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) हे मराठी सिनेसृष्टीला पडलेलं एक गोडं स्वप्न असं म्हटलं जातं. या अवलियानं आपल्या अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल दोन दशकं मराठी माणसाला खळखळवून हसवलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ‘झपाटलेला’, ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘अफलातून’ असे कित्येक चित्रपट आजही तितक्याच आवडीनं पाहिले जातात. (Laxmikant Berde Superhit comedy films) परंतु अनेकदा चाहत्यांना प्रश्न असा पडतो की या अभिनेत्याला इतके भन्नाट विनोद सुचायचे कसे? त्यांचा प्रेरणास्त्रोत काय होता? या प्रश्नाचं उत्तर स्वत: लक्ष्मीकांत यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत दिलं होतं. पाहुया या दुर्मिळ मुलाखतीत काय म्हणाले होते लक्ष्मीकांत बेर्डे?
लक्ष्मीकांत यांनी आपल्या विनोदाचं श्रेय आपल्या आईला दिलं होतं. त्यांच्या आईचं नाव रजनी असं होतं. त्यांचं संपूर्ण आयुष्य गरीबीत गेलं. तरीही त्यांनी अफाट कष्ट करुन आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं. बिकट आर्थिक परिस्थितीमुळं त्यांना कधीही आपली स्वप्न पूर्ण करता आली नाही. मात्र याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर कधीही दिसली नाही. त्या कायम हसतमुख राहायच्या. त्यांचा स्वभाव फार मिष्किल होता. अगदी लहान लहान गोष्टींमध्ये त्या आनंद शोधायच्या. आई कडूनच विनोदाचा हा वारसा लक्ष्मीकांत यांना मिळाला. त्यामुळं विनोद करण्यासाठी भव्य दिव्य डायलॉग्स असलायला हवेत असं त्यांना कधी वाटायचं नाही. त्यांनी कायम आपल्या आईसारखाच विनोद करण्याचा प्रयत्न केला.
आजी-नातीचा धम्माल डान्स; अभिनेत्री अदिती द्रविडचा हा VIDEO एकदा पाहाचं
या मुलाखतीत त्यांनी आपल्या आईच्या विनोदी प्रवृत्तीचं दर्शन घडवण्यासाठी एक गंमतीशीर किस्सा सांगितला. त्यांची आई आजारी होती. त्यामुळं उपचारासाठी त्यांना एका रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु त्यावेळी डॉक्टरांचा संप सुरु होता त्यामुळं उपचार कार्यात अडथळे येत होते. तेवढ्यात रजनी असा आवाज देण्यात आला. त्यामुळं लगेचच त्यांना उपचारासाठी पुढे नेण्यात आलं. परंतु त्यांच्या ऐवजी दुसऱ्याच कुणा महिलेला बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी लक्ष्मीकांत आणि त्यांचे भाऊ थोडे गोंधळले होतं. पण त्याक्षणी देखील त्यांनी आपल्या विनोदाचं दर्शन घडवलं त्या जोरजोरात हसू लागल्या. कारण आतमध्ये ज्या रजनीला बोलावण्यात आलं होतं ती बाई गरोदर होती. या वयात माझी डिलेव्हरी करणार का? असं म्हणत त्या हसू लागल्या. अत्यंत आजारी असतानाही आसपासचं वातावरण प्रसन्न ठेवण्याचा त्यांचा हा खटाटोप हेच लक्ष्मीकांत यांच्या विनोदामागचा खरा प्रेरणास्त्रोत असं ते मानायचे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये जे अफाट यश मिळवलं. त्याचं संपूर्ण श्रेय त्यांनी आपल्या आईला दिलं होतं. मात्र त्याचं हे यश आई कधीही पाहू शकली नाही ही खंत देखील कायम त्यांच्या मनात राहिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.