मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'रोहितसारखं करु नकोस,' इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतला कपिल देव यांचा सल्ला

'रोहितसारखं करु नकोस,' इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतला कपिल देव यांचा सल्ला

ऋषभ पंतकडून (Rishabh Pant) आगामी इंग्लंड दौऱ्यातही टीमला मोठ्या अपेक्षा आहेत. या दौऱ्यापूर्वी महान क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे वर्ल्ड कप विजेते कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) यांनी पंतला कानमंत्र दिला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 मे: टीम इंडियाचा विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्यासाठी हे वर्ष चांगले गेले आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मालिकेत चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेतही त्याच्या कॅप्टनसीने अनेकांना प्रभावित केले. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याचीपूर्वी ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. ऋषभ पंतकडून आगामी इंग्लंड दौऱ्यातही टीमला मोठ्या अपेक्षा आहेत. या दौऱ्यापूर्वी महान क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे वर्ल्ड कप विजेते कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) यांनी पंतला कानमंत्र दिला आहे.

काय दिला सल्ला?

ऋषभ पंतने थोडं संथ खेळण्याची गरज आहे, असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. इंग्लंड दौऱ्यात पंतला आक्रमकतेबरोबरच सावध खेळ खेळण्याची आवश्यकता आहे. तसं केलं तरच त्याला दीर्घकाळ बॅटींग करता येईल, असे कपिल यांनी सांगितले.

रोहित शर्माशी तुलना

कपिल देवने समान शैलीच्या आधारावर ऋषभ पंतची तुलना रोहित शर्माशी (Rohit Sharma) केली. 'मिड डे' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कपिल म्हणाले की, "टीम इंडियात आल्यानंतर पंत खूप परिपक्व झाल्याचं दिसत आहे. त्याच्याकडे शॉट्स खेळण्यासाठी जास्त वेळ असल्यााचे वाटते. त्याच्याकडे अनेक प्रकारचे शॉट्स आहेत. मात्र इंग्लंड दौरा आव्हानात्मक असणार आहे.

त्याने जास्त वेळ बॅटींग करावी, तसेच प्रत्येक बॉलर फटका मारण्याचा प्रयत्न करु नये. आपण रोहित शर्माबद्दल देखील हेच सांगतो. रोहित शर्माकडे देखील खूप शॉट्स आहेत. पण तो सतत क्रिजच्या बाहेर येऊन खेळत असतो. ऋषभ पंत 'मॅच विनर' आहे. त्याने आक्रमक फटकेबाजी करण्यापूर्वी स्थिरावण्यावर भर द्यावा. इंग्लंडचा दौरा अवघड आहे, इतकंच मी सांगेन." असे कपिल यांनी सांगितले.

टेनिसपटूला प्रपोज करण्यासाठी अर्जेंटीनामध्ये गेले होते रवी शास्त्री, बॉलिवूड अभिनेत्रींशीही होते कनेक्शन

ऋषभ पंत सध्या टीम इंडियातील इतर खेळाडूंसोबत मुंबईमध्ये क्वारंटाईन आहे. तो 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल.  इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियाची पहिली टेस्ट ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) आहे. ही टेस्ट न्यूझीलंड विरुद्ध असून 18 जून पासून सुरु होणार आहे.

First published:

Tags: Cricket, India vs england, Rishabh pant, Rohit sharma