'रंग माझा वेगळा' मालिकेतून कार्तिकच्या रुपात घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे आशुतोष गोखले होय. आशुतोष आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 'रंग माझा वेगळा' या मालिकेमुळे आशुतोषला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. आशुतोषला अभिनयाचा वारसा अगदी बालपणापासूनचं मिळाला आहे. आशुतोष हा ज्येष्ठ अभिनेता विजय गोखले यांचा मुलगा आहे. आशुतोषने सुद्धा आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात आपलं नाव उमटवायला सुरुवात केली आहे. आशुतोष झी मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका'तुला पाहते रे' मध्ये झळकला होता. यामध्ये त्याने अभिनेता सुबोध भावेच्या भावाची भूमिका साकारली होती. कॉलेजमध्ये असताना सुद्धा आशुतोषने एकांकिका आणि नाटकांमध्ये काम केल आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या निमित्ताने आशुतोष मुख्य अभिनेत्याच्या रुपात झळकला आहे. यामधील 'कार्तिक' ही व्यक्तिरेखा लोकांना खुपचं पसंत पडत आहे. यातील कार्तिक आणि दीपाची जोडी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातल आहे.