मुंबई, 2 मार्च : अभिनेता अजय देवगण नेहमीप्रमाणे शूटिंगसाठी मुंबईत गोरेगाव फिल्म सिटीकडे निघाला असताना त्याला वेगळाच अनुभव (Ajay Devgan car stopped mumbai news) आला. सकाळी 9 च्या सुमारास त्याच्या गाडी समोर अचानक एक व्यक्ती आली आणि त्याचा रस्ता अडवला. काही क्षण अजय देवगणला नेमकं चाललंय काय हे लक्षातच आलं नाही. तेवढ्यात ती व्यक्ती त्याच्या निषेधार्थ काही बरळू लागली. “दिल्लीत इतके दिवस झाले शेतकरी आंदोलन (farmers protest) करत आहेत. त्यांचं तू समर्थन का केलं नाही?" याचा जाब विचारत त्या व्यक्तीने अजय देवगणची गाडी रोखून धरली. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट का केलं नाही, असं ही व्यक्ती त्याला विचारू लागली.
मुंबईच्या रस्त्यावर जवळपास 15 मिनिटं या व्यक्तीने अभिनेता अजय देवगणची गाडी रोखून धरली होती. दरम्यान बघ्यांची गर्दी जमली होती. हा सर्व प्रकार अनेक जण पाहात होते, मात्र कोणीच मध्ये पडलं नाही किंवा अभिनेत्याच्या मदतीला आलं नाही. शेवटी त्या व्यक्तीचं म्हणणं काय हे देखील अजय देवगणने माहिती करून घेतलं नाही. घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या या व्यक्तीला ताब्यात घेऊन रस्ता मोकळा केला. अभिनेता अजय देवगण याची गाडी गोरेगाव फिल्म सिटीपर्यंत पोलिसांच्या बंदोबस्तातच सोडली गेली. देवगणविरोधात निदर्शनं करणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.
हा काय प्रश्न आहे? असं कसं कुणी मुलीला विचारलं? तापसी आता कोर्टावरच संतापली
पोलिस चौकशीत त्या व्यक्तीने आपण अजय देवगणला कोणतंही नुकसान पोहोचवण्याच्या हेतूने अडवलं नाही, तर आपण आपली कैफियत त्याच्याकडे मांडत होतो, असं सांगितलं. अजय देवगणसारख्या सुपर स्टारने आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवावं, अशी माझी इच्छा होती, असं अटक केलेल्या व्यक्तीने सांगितलं. अटक झालेल्या व्यक्तीच्या साथीदारांनी अटकेचा निषेध केला आहे. आपलं म्हणणं सांगण्यासाठी अभिनेता अजय देवगणची गाडी अडवली यांत कोणता गुन्हा झाला ज्यामुळे आमच्या साथीदाराला अटक केली? असा प्रश्न ते विचारत आहेत.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आता वेगळ्याच वळणावर, वडिलांनी घेतली पोलिसांकडे धाव
नवीन कृषी कायद्या विरोधात (Protesting farmers against new farm laws) गेले कित्येक दिवस दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. मध्यंतरी या आंदोलनाने हिंसक वळण देखील घेतलं होतं. एवढंच नाही तर परदेशी कलाकारांचा वापर करून शेतकरी आंदोलनाचा विषय बेकायदेशीरपणे वापरला. यामुळे टुलकिट सारखा प्रकार देखील या दरम्यान समोर आला होता. शिवाय बाॅलिवूडमधील अनेक भारतीय कलाकारांनी तसंच खेळाडूंनी देखील शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट केले होते त्यावरून महाराष्ट्रात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष देखील झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay devgan, Farmers protest, Mumbai