मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आता वेगळ्याच वळणावर, वडिलांनी घेतली पोलीस स्टेशनमध्ये धाव

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आता वेगळ्याच वळणावर, वडिलांनी घेतली पोलीस स्टेशनमध्ये धाव

Pooja Chavan's father complaint : पूजाचे वडील लहू चव्हाण यांनीही पोलीस स्थानकात धाव घेतली आहे.

Pooja Chavan's father complaint : पूजाचे वडील लहू चव्हाण यांनीही पोलीस स्थानकात धाव घेतली आहे.

Pooja Chavan's father complaint : पूजाचे वडील लहू चव्हाण यांनीही पोलीस स्थानकात धाव घेतली आहे.

बीड, 2 मार्च : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. या प्रकरणात गंभीर आरोपामुळे शिवसेना नेते संजय राठोड (Shivsena Leader Sanjay Rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरही हे प्रकरण शांत होण्याचं नाव घेत नसून आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू आहेत. अशातच चुलत आजी असल्याचा दावा करत एका महिलेने पूजाच्या वडिलांविरोधातच गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर पूजाचे वडील लहू चव्हाण यांनीही पोलीस (Pooja Chavan's Father) स्थानकात धाव घेतली आहे.

शांताबाई राठोड यांच्याविरोधात लहू चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे. परळी शहर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली. हे प्रकरण मिटवण्यासाठी मी 5 कोटी रुपये घेतल्याचा खोटा आरोप शांताबाई राठोड यांनी केला होता. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करत असल्याची भूमिका लहू चव्हाण यांनी घेतली आहे.

शांताबाई राठोड यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

'5 कोटी रुपये दिलेले आहेत म्हणून तिच्या आई वडिलांचे तोंड बंद आहे. पूजाचे आणि माझे चांगले रिलेशन होते. अरुण राठोड हा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. पुजाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न म्हणून तृप्ती देसाई यांची मदत घेतली. पूजाच्या आईवडिलांना संजय राठोडवर गुन्हा दाखल होऊ द्यायचा नाही. पोलिसांना सगळं माहिती असताना गुन्हा दाखल होत नाही. जर गुन्हा दाखल झाला नाहीतर मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार,' असं म्हणत शांताबाई राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती.

हेही वाचा - Pooja Chavan Death Case: प्रकरण दडपण्यासाठी 5 कोटींच आमिष दिल्याचा पूजाच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेविषयी वारंवार संशय घेण्यात येत आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही याबाबत वेळोवेळी आरोप केले आहेत. तसंच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं, अशी मागणीही केली आहे.

First published:

Tags: Beed news, Pooja Chavan