मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेआधी धक्कादायक प्रकार, एकाला अटक

मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेआधी धक्कादायक प्रकार, एकाला अटक


पंतप्रधान मोदी यांची वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मैदानावर सभा पार पडली. यावेळी सभेपूर्वी 35 वर्षीय घुसखोराला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलं

पंतप्रधान मोदी यांची वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मैदानावर सभा पार पडली. यावेळी सभेपूर्वी 35 वर्षीय घुसखोराला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलं

पंतप्रधान मोदी यांची वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मैदानावर सभा पार पडली. यावेळी सभेपूर्वी 35 वर्षीय घुसखोराला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीकेसीतील सभेपूर्वी सुरक्षा रक्षकांनी एका 35 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. NSGचं ओळखपत्र घालून हा व्यक्ती सभेच्या स्थळी पोहोचला होता.

पंतप्रधान मोदी यांची वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मैदानावर सभा पार पडली. यावेळी सभेपूर्वी 35 वर्षीय घुसखोराला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलं. रामेश्वर मिश्रा असं घुसखोरीच्या प्रयत्ना असलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मिश्रा हा 13 जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या NSGचं ओळखपत्र घालून, SPGचं कडे ओलांडण्याच्या प्रयत्नात होता.

(फडणवीस रात्री उशीरा शिंदेंच्या भेटीला; 1 तासाच्या चर्चेनंतर तडकाफडकी गेले, चर्चांना उधाण)

व्हीव्हीआयपी झोनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने ‘गार्ड्स रेजिमेंट’चा नाईक असल्याचा दावा केला होता. रामेश्वर मिश्रा याला दुपारी 3 च्या सुमारास मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अडवले. त्यावेळी 13 जानेवारी रोजी जारी करण्यात आलेले एलिट नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (NSG) चे ओळखपत्र घातल्याने संशय निर्माण झाला होता, ज्यामध्ये तो रेंजर म्हणून पोस्ट करण्यात आला होता, परंतु दोरीच्या रिबनवर 'दिल्ली पोलिस सुरक्षा (पीएम)' असं लिहिलं होतं. तब्बल 30 मिनिटं मुंबई पोलिसांनी त्याचा पाठपुरावा करून, त्याचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला.

(हे ही वाचा : कोकणात लवकरच राजकीय भूकंप, धक्का शिंदेंना पण हादरे रामदास कदमांना!)

पोलिसांनी त्याच्या ओळखपत्राची तपासणी केली असता त्याच छेडछाड करून ते बनवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला वांद्रे न्यायालयात हजर केले असता 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: PM Narendra Modi, पंतप्रधान नरेंद्र मोदी