मुंबई, 12 जून : प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या भेटीत प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सक्षम पर्याय निवडून देण्याची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. तब्बल 3 तासही बैठक सुरू होती. या बैठकीत देशासह राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात नव्याने रणनीती आखण्यात यावी, यासाठी काय नियोजन केले जावे, महाराष्ट्र विधानसभेत कशा पद्धतीने रणनीती आखली जावी, यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त दैनिक लोकमत ने दिले आहे. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांच्यासोबत राज्यात रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने नियोजन करावे, काय समीकरण आखले जावे, मतदारसंघनिहाय कसे नियोजन असावे, याबद्दलही किशोर यांनी भाष्य केले. VIDEO : बॉलरला मारण्यासाठी धावला होता मियांदाद, किरण मोरेची केली होती नक्कल देशपातळीवर विरोधकांकडे एक आश्वासक चेहऱ्याची गरज आहे. त्यासाठी सामूहिक नेतृत्व आणावे लागणार आहे. याआधी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात लढत पाहण्यास मिळाली. पण, आता परिस्थितीत बदलली असून असं चित्र पुन्हा पुढे येऊ नये, यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकींमध्ये ज्या भागात कमी शिक्षण झाले आहे, एससी आणि एसटीसाठी मतदारसंघ आहे, अशा ठिकाणी भाजपला जास्त मतं मिळाली आहे, अशी वस्तूस्थितीही किशोर यांनी मांडली. भाजपविरोधात भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत बोलून मोट बांधावी लागणार आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी आणि तेलंगणाचे चंद्रशेखर राव हे मोदींच्याविरोधात ठाम भूमिका मांडतात. प्रशांत किशोर हे लवकरच जगमोहन रेड्डी यांच्याशी बोलणार आहे. तर शरद पवार हे इतर दोन्ही नेत्यांशी बोलणार आहे. आईच्या मृत्यूनंतरही मुलाला नाही फुटला पाझर; अंत्यसंस्काराला येण्यास नकार ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष आहेत त्या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना जास्त जागा सोडल्यामुळे भाजपलाच फायदा झाला. त्यामुळे स्थानिक पक्षांचे नुकसान झाले. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत असंच चित्र पाहण्यास मिळालं होतं, त्यामुळे योग्य ते नियोजन करावे लागले, असंही किशोर यांनी मत नोंदवलं. लोकसभा आणि विधान निवडणुकीत काँग्रेसने निवडणूक जिंकण्यासाठी लढण्याची इच्छा दिसली नाही. त्यामुळे पारंपरिक मतदारसंघातून निरुत्साह पाहण्यास मिळाला. काँग्रेसला जास्त जागा सोडल्या तर याचा फायदा हा भाजपला झाला आहे, असंही किशोर यांनी शरद पवार यांना पटवून दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.