Home /News /sport /

VIDEO : जेव्हा बॉलरला मारण्यासाठी धावला होता मियांदाद, किरण मोरेची केली होती नक्कल

VIDEO : जेव्हा बॉलरला मारण्यासाठी धावला होता मियांदाद, किरण मोरेची केली होती नक्कल

पाकिस्तानच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वात मियांदाद (Javed Miandad) यांनी छाप उमटवली आहे. त्यांनी न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच टेस्टमध्ये 163 रनची खेळी केली होती.

    कराची, 12 जून : पाकिस्तान क्रिकेटमध्ये 12 जून हा खास दिवस आहे. याच दिवशी 1957 साली दिग्गज बॅट्समन जावेद मियांदाद (Javed Miandad) यांचा जन्म झाला. पाकिस्तानच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वात मियांदाद यांनी छाप उमटवली आहे. त्यांनी न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच टेस्टमध्ये 163 रनची खेळी केली होती. मियांदाद यांची टेस्ट क्रिकेटमधील सरासरी कधीही 50 पेक्षा कमी झाली नाही. त्यांनी टेस्ट कारकिर्दीच्या चौथ्या इनिंगमध्येच द्विशतक झळकावले होते. त्यांच्या नावावर सहा द्विशतकाची नोंद आहे. विदेशामध्ये 15 वेळा LBW झालेले मियांदाद पाकिस्तानमध्ये मात्र फक्त एक वेळा LBW झाले. मियांदाद यांनी सहा वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केले होते. पर्थमध्ये 1981 साली झालेल्या टेस्टमध्ये त्यांची एक कृती चांगलीच वादग्रस्त ठरली होती. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर डेनिस लिली यांच्यावर त्यांनी रागाने बॅट उगारली होती. विशेष म्हणजे त्यावेळी ते पाकिस्तानचे कॅप्टन होते. मियांदादला कॅप्टन केल्यानंतर टीममधील काही सीनियर खेळाडू खूश नव्हते, असे सांगितले जाते. French Open 2021: नोवाक जोकोविचने रचला इतिहास, सेमी फायनलमध्ये पहिल्यांदाच हरला नदाल 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचे विकेट किपर किरण मोरे (Kiran More) यांना चिडवण्यासाठी मियांदाद यांनी मैदानात बेडुक उड्या मारल्या होत्या. त्यांची ही कृती आजही क्रिकेट फॅन्सच्या लक्षात आहे. मियांदाद यांनी टेस्ट कारकिर्दीमध्ये 23 शतक आणि 43 अर्धशतकांच्या मदतीनं एकूण 8832 रन काढले आहेत. त्यांनी 223 वन-डे मध्ये एकूण 7381 रन केले. त्यांच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 17 आणि वन-डे मध्ये सात विकेट्स देखील आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, On this Day, Pakistan

    पुढील बातम्या