सोलापूर, 12 जून: म्हातारपणी आपला आधार बनावा, आपला सांभाळ करावा आणि मृत्यूनंतर आपल्या चिथेला अग्नि द्यावी, एवढी माफक अपेक्षा ठेऊन अनेकांना वंशाचा दिवा हवा असतो. पण सोलापूर जिल्ह्याच्या वैरागमधील एका मातेला मृत्यूनंतर मुलाच्या हातून अग्नि मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. आईच्या मृत्यूची माहिती दिल्यानंतरही मुलाने आईच्या अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर मात्र कारवाईच्या भीतीने मुलगा अंत्यसंस्काराला हजर झाला आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी वैराग येथील बस स्थानकावर एक वृद्ध महिला बेशुद्धावस्थेत आढळली होती. महिला अनाथ असल्याचं समजून स्थानिक सामाजिक संस्थेनं संबंधित महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याबरोबर महिलेच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. पण सामाजिक संस्थेच्या हाती निराशाचं आली. कारण संपर्क केल्यानंतरही मुलगा आपल्या आईला रुग्णालयात भेटायला आला नाही. इतकंच नव्हे तर वृद्धेच्या मृत्यूनंतरही मुलाने अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला. पण कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर मात्र मुलगा आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी हजर झाल आहे. 24 मे रोजी प्रार्थना फाऊंडेशनचे फारुख बागवान यांना वैराग बस स्थानकात एका वृद्ध महिला बेशुद्धावस्थेत आढळली. यावेळी बागवान यांनी तातडीनं या महिलेला रुग्णालयात दाखल केलं. यानंतर बागवान यांचे सहकारी प्रसाद मोहिते यांनी बेघर महिलेच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. यावेळी संबंधित महिला तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी असल्याचं कळालं. त्याबरोबर संबंधित महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहितीही समोर आली. हे ही वाचा- शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण दोन्ही मुलं उच्च शिक्षित असूनही ते आपल्या जन्मदातीच्या देखभालीसाठी आले नाहीत. गुरुवारी उपचारादरम्यान संबंधित महिलेचा मृत्यू झाला. यानंतर मोहिते यांनी पुन्हा वृद्धेच्या मुलांशी संपर्क साधला. किमान अंत्यसंस्कारासाठी तरी या, अशी विनंती केली. तरीही मुलाच्या हृदयाला पाझर फुटला नाही. ‘अंत्यसंस्कारही तुम्हीच करा’ असं मुलाकडून सांगण्यात आलं. यानंतर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवताच वृद्ध महिलेचा मुलगा अंत्यसंस्कारासाठी हजर झाला आहे. जिवंतपणी बेघर सोडलेल्या या मातेला मृत्यूनंतरही संघर्ष करावा लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.