जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / एकच घाव अन् खेळ खल्लास; नालासोपाऱ्यात भाऊबीजेदिवशीच वृद्ध महिलेची निर्घृण हत्या

एकच घाव अन् खेळ खल्लास; नालासोपाऱ्यात भाऊबीजेदिवशीच वृद्ध महिलेची निर्घृण हत्या

एकच घाव अन् खेळ खल्लास; नालासोपाऱ्यात भाऊबीजेदिवशीच वृद्ध महिलेची निर्घृण हत्या

Murder in Nalasopara: नालासोपारा पूर्व येथील अलकापुरी परिसरात एका 80 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या (Old woman brutal murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नालासोपारा, 07 नोव्हेंबर: नालासोपारा (Nalasopara) पूर्व येथील अलकापुरी परिसरात एका 80 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या ((Old woman brutal murder)) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐन भाऊबीज सणाच्या मुहुर्तावरच वयोवृद्ध महिलेची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, आचोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वयोवृद्ध महिलेची झालेली अवस्था पाहून पोलीसही हादरले आहेत. याप्रकरणी आचोळा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. वाली शिवसागर असं हत्या झालेल्या 80 वर्षीय वृद्ध महिलेचं नाव असून त्या नालासोपारा पूर्व येथील अलकापुरी परिसरातील लक्ष्मी निवास येथील रहिवासी होत्या. दरम्यान, शिवारी भाऊबीजेच्या दिवशीच अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली आहे. मारेकऱ्यांनी कसल्यातरी धारदार शस्त्राने महिलेच्या डोक्यात गंभीर वार (Attack with sharp weapon) केला आहे. हा वार इतका भयंकर होता की महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हेही वाचा- सख्खा भाऊच जीवावर उठला; ऐन दिवाळीत धाकट्यावर कुऱ्हाडीने घाव घालत केला खेळ खल्लास शनिवारी दुपारी हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी वृद्धेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून चौकशीला सुरुवात केली आहे. हेही वाचा- पाडव्याच्या दिवशी कुटुंबाचा हृदय चिरणारा आक्रोश;सांगलीत तिघींचा ओढ्यात बुडून अंत संबंधित महिलेची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली, याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांकडे नाही. घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयास्पद हालचाली आढळतात का? याचा तपास पोलीस करत आहेत. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली आहे का? या अनुषंगाने देखील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात