• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • पाडव्याच्या दिवशीच कुटुंबाचा हृदय चिरणारा आक्रोश; सांगलीत तिघींचा ओढ्यात बुडून मृत्यू

पाडव्याच्या दिवशीच कुटुंबाचा हृदय चिरणारा आक्रोश; सांगलीत तिघींचा ओढ्यात बुडून मृत्यू

Sangli News: सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील टाकळी याठिकाणी ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी कुटुंबाचा हृदय चिरणारा आक्रोश पाहायला मिळाला आहे. याठिकाणी दिवाळी पाडव्याच्या दिवशी दोन तरुणींसह एका चिमुकलीचा दुर्दैवी अंत (Three girls drown into stream) झाला आहे.

 • Share this:
  सांगली, 06 नोव्हेंबर: सांगली (Sangli) जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील टाकळी याठिकाणी ऐन दिवाळी पाडव्याच्या (Diwali Padawa) दिवशी कुटुंबाचा हृदय चिरणारा आक्रोश पाहायला मिळाला आहे. याठिकाणी दिवाळी पाडव्याच्या दिवशी दोन तरुणींसह एका चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित तिन्ही मुली ओढ्यावर आंघोळ करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू (Three girls drown into stream) झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तिन्ही मुलींचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. नंदिनी देवा काळे, मेघा काळे आणि स्वप्नाली टवळ्या पवार अशी मृत पावलेल्या तिघींची नावं आहेत. संबंधित सर्व मुली टाकळी येथील आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी आहेत. दिपावली पाडव्याच्या दिवशी संबंधित तिन्ही मुली आंघोळीसाठी टाकळी गावातील ओढ्यावर गेल्या होत्या. आंघोळीला जाऊन बराच वेळ झाला, तरीही मुली माघारी कशा आल्या नाहीत? यामुळे कुटुंबीयांनी त्यांना शोधायला सुरुवात केली. हेही वाचा-सख्खा भाऊच जीवावर उठला; ऐन दिवाळीत धाकट्यावर कुऱ्हाडीने घाव घालत केला खेळ खल्लास दरम्यान, ओढ्याच्या काठावर तिघींच्या चपला आणि कपडे कुटुंबीयांना दिसले. संबंधित तिघीही पाण्यात बुडाल्या असाव्यात, अशी शंका कुटुंबीयांना आली. त्यामुळे नातेवाईकांनी या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, संबंधित मुलींचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहेत. हेही वाचा-मामाच्या गावाला जाताना बहीण-भावावर काळाचा घाला; भाऊबीजेआधीच झाला हृदयद्रावक शेवट संबंधित तिन्ही मुली पारधी समाजाच्या असून गरीब कुटुंबातील आहेत. असं असताना ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी तिघींचा दुर्दैवी अंत झाल्याने मृत मुलींच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: