जालना, 06 नोव्हेंबर: जालना (Jalna) शहरातील मियाँसाहेब दर्गा परिसरात एका तरुणाने आपल्या धाकट्याने भावाची कुऱ्हाडीने घाव घालून (Attack with ax) निर्घृण हत्या (elder brother killed younger brother) केली आहे. ऐन दिवाळीत तरुणाने आपल्या भावाला भयंकर मृत्यू (Brutal murder) दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
शेख शोजेब शेख मन्सूर असं हत्या झालेल्या 34 वर्षीय भावाचं नाव आहे. तर शेख खोसरी शेख मन्सूर असं गुन्हा दाखल झालेल्या भावाचं नाव आहे. मृत शोजेब आणि आरोपी भाऊ शेख खोसरी दोघंही जालना शहरातील मियाँसाहेब दर्गा परिसरात आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्याला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत धाकटा भाऊ शेख शोजेब हा मानसिक रुग्ण आहे. तसेच दोन्ही भावात किरकोळ कारणातून अनेकदा वाद देखील झाला आहे.
हेही वाचा-अॅटमबॉम्बने घेतला पुण्यातील तरुणाचा जीव; दुर्दैवी घटनेत दिवाळीदिवशीच झाला अंत
दरम्यान, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास दोन्ही भावांत किरकोळ कारणातून पुन्हा वाद झाला होता. किरकोळ कारणातून सुरू झालेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. वाद वाढत गेल्याने मोठा भाऊ शेख खोसरी याला संताप अनावर झाला. त्यामुळे रागाच्या भरात शेख खोसरी याने लहान भाऊ शेख शोजेब मन्सूर याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्याने धाकट्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने जबरी घाव घातला आहे.
हेही वाचा-मामाच्या गावाला जाताना बहीण-भावावर काळाचा घाला; भाऊबीजेआधीच झाला हृदयद्रावक शेवट
हा वार इतका भयंकर होता की, धाकटा भाऊ शेख शोजेब याचा जागीच मृत्यू झाला. निर्घृण हत्येच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच कदीम पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. जालन्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांनी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा पुढील तपास कदीम पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Brother murder, Crime news