जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / नवी मुंबईत शिवसेनेला पुन्हा धक्का; आणखी 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील

नवी मुंबईत शिवसेनेला पुन्हा धक्का; आणखी 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील

नवी मुंबईत शिवसेनेला पुन्हा धक्का; आणखी 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील

अजूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणी कमी झालेल्या दिसत नाही. आता नवी मुंबईत शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

  • -MIN READ Navi Mumbai,Thane,Maharashtra
  • Last Updated :

नवी मुंबई 15 जुलै : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील जवळपास 40 आमदार आणि अपक्ष 10 आमदारांनी बंडखोरी (Reble MLA) केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अजूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणी कमी झालेल्या दिसत नाही. आता नवी मुंबईत शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. ठाण्यात शिवसेनेला पुन्हा खूप मोठं खिंडार, गोपाळ लांडगेंची शिंदे गटाला साथ आता आणखी 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. नंदनवन येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला गेला. यापूर्वी 28 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. ऐरोली पाठोपाठ आता बेलापूर मतदारसंघालाही खिंडार पडलं आहे. रामदास पवळे, रंगनाथ औटी, काशिनाथ पवार , रामचंद्र पाटील, ज्ञानेश्वर सुतार हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दरम्यान गुरुवारीच शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटासोबत हातमिळवणी केली आहे. शिवसेनेसाठी हा खूप मोठा झटका आहे. गोपाळ लांडगे यांचं कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये चांगलं प्रभुत्व आहे. त्यांनी शिंदे सेनेला साथ दिल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडल्याची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी, देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतीर्था’वर जाणार, चर्चांना उधाण कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा त्याग करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण प्रमाण मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक राजेश मोरे, माजी नगरसेवक विशाल पावशे, माजी नगरसेवक प्रशांत काळे यांनी देखील यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात