Home /News /mumbai /

मोठी बातमी, 25 जिल्हे होणार अनलॉक, मुंबईची लोकल होणार सुरू? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मोठी बातमी, 25 जिल्हे होणार अनलॉक, मुंबईची लोकल होणार सुरू? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) उद्या गुरुवारी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्ससोबत बैठक घेणार आहे.

    मुंबई, 28 जुलै : राज्यात कोरोनाची (maharashtra corona cases) लाट ओसरल्यामुळे अनेक जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. पण, नियमांचे उल्लंघन आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नियम पुन्हा एकदा लागू करण्यात आले आहे. पण, आता रुग्ण संख्या आटोक्यात आल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनलॉकची (Maharashtra unlock in 5 levels) घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) उद्या गुरुवारी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्ससोबत बैठक घेणार आहे. लॉकडाऊन नियम शिथिल करण्याबाबत ही बैठक असणार आहे. या बैठकीत पूर्णपणे अनलॉक करता येईल का, याबद्दल चर्चा केली जाणार आहे. या बैठकीमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून लोकल सुरू करण्यात याव्या अशी मागणी केली जात आहे. ठाकरे सरकारचा खासगी शाळांना दणका, 15 टक्के फी कपात! 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे या जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले जाणार आहे. दुकानं खुली ठेवण्यासाठी 4 वाजेपर्यंत परवानगी आहे. ते नियम बदलले जातील, विकेंडला लॉकडाऊन आहे, त्यातील शनिवारी किंवा रविवार हा वगळला जाईल. फक्त एकच दिवस बंद ठेवण्यात येईल, असे निर्णय घेतले जाईल. याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली आहे, यावर ते योग्य तो निर्णय घेतली, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. सध्या राज्यात पाच टप्प्यात निर्बंध रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे राज्यात जून महिन्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या टप्पेवारीनुसार,  कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता या आधारावरच हे निर्बंध शिथील करण्यात येतात. दर आठवड्याला यात जिल्ह्यानुसार बदल होत असतात. राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल पहिल्या दोन टप्प्यांमध्ये 5 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असतो. पहिल्या टप्प्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर असलेले रुग्ण तर दुसऱ्या टप्प्यात 25 ते 40 टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण असलेल्या जिल्हे येतात. तिसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्के किंवा 40 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण ऑक्सिजन बेडवर असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के आणि ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांहून जास्त भरलेले जिल्हे येतात. पाचव्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त किंवा ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Lockdown, Mumbai

    पुढील बातम्या