Home /News /mumbai /

ठाकरे सरकारचा खासगी शाळांना दणका, 15 टक्के फी कपात!

ठाकरे सरकारचा खासगी शाळांना दणका, 15 टक्के फी कपात!

'हा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे, याच उल्लंघन झालं तर तो दंडनीय अपराध राहील'

    मुंबई, 28 जुलै : कोरोनाच्या (corana) काळात शाळा बंद असताना सुद्धा भरमसाठा फी वसूल करणाऱ्या शिक्षण सम्राटांना अखेर महाविकास आघाडी सरकारने दणका दिला आहे. खासगी शाळांची फीमध्ये  (School Fees) 15 टक्के कपात करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आज मंत्रिमंडळ बैठक संपली. या बैठकीत शाळांच्या फी वाढीबद्दल चर्चा झाली आणि याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे.  यात खाजगी शाळाच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षांपासून ही फी कपात होईल. अंमलबजावणी बाबत लवकरच नियम जाहीर करणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. फळ खाताना करू नाका ‘या’ चुका; होतील पोटाचे विकार हा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे, याच उल्लंघन झालं तर तो दंडनीय अपराध राहील. या वर्षी ज्यांनी फी भरलेली आहे, त्या बाबत लवकरच निर्णय कळवण्यात येईल, असंही गायकवाड यांनी सांगितलं. Good News! Google च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 50000, वाचा काय आहे प्रोसेस याआधीही कोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातही काही संस्था तसंच शाळा पालकांना शैक्षणिक फी भरण्याची सक्ती करत होत्या. त्यामुळे,याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानं शासनानं परिपत्रक काढत सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना या आणि आगामी वर्षाची शैक्षणिक फी   भरण्यास सक्ती करू नये, असे आदेश दिले होते. पण, या निर्णयाविरोधात शाळांनी हायकोर्टाचे दार ठोठावले होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या