• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • BREAKING : राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

BREAKING : राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

जयंत पाटील (jayant patil) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते या बैठकीतून बाहेर पडले.

 • Share this:
  मुंबई, 28 जुलै : राज्यात आलेल्या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते या बैठकीतून बाहेर पडले. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital mumbai )  दाखल करण्यात आले आहे. प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक बैठक सुरू असताना मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील हे बाहेर पडले. त्यांच्यासोबत इतर 4 मंत्री सुद्धा बाहेर पडले आहे. जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे ते आता ब्रीच कॅडी हॉस्पिटलकडे निघाले आहे. 5 वर्षात 3 लाखांचे झाले 11 लाख, तुम्ही देखील 100 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक सध्या जयंत पाटील ब्रीच कॅन्डी हॅास्पिटलमध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या आज वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येणार आहे. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. IND vs SL : टीम इंडियाचे 9 खेळाडू T20 सीरिजमधून बाहेर, 5 नेट खेळाडूंना संधी जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. त्यांच्यावर आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये काही चाचण्या करण्यात येणार आहे, अशी अधिकृत माहिती जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
  Published by:sachin Salve
  First published: