मुंबई, 22 मार्च : फडणवीस सरकारच्या (Fadanvis Goverment) महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत (tree planting campaign scam) घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राबवलेल्या या मोहिमेत प्रत्यक्ष खर्च लपवण्यात आल्याचे समोर आले आहे. तब्बल 1250 कोटींचा हिशेबाची नोंद नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबद्दल चौकशी समितीची बैठक होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधीर मुनंगटीवार यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली होती. 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. कोण पाहातंय तुमचं WhatsApp प्रोफाईल? ही आहे सोपी ट्रिक या मोहिमेत 1250 कोटी रुपयांची नोंद होत नसल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्ष खर्च 3688 कोटी झाला आहे. पण विधिमंडळामध्ये 2438 कोटी खर्च दाखवला आहे. तसंच या मोहिमेसाठी 250 कोटी जाहिरातीवर खर्च करण्यात आला आहे. तसंच, माहिती जनसंपर्क विभागात हे टेंडर रेकॉर्डवर नसल्याचेही समोर आले आहे. विधिमंडळ समितीची आज होणार बैठक आहे. 15 आमदार यांच्या समितीसमोर याबद्दल चर्चा होणार आहे. काय आहे प्रकरण? फडणवीस सरकारच्या काळात 33 कोटी वृक्षारोपण करण्यात आले होते. राज्यात वर्ष 2016 ते 2017 आणि 2019-20 या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. ऑक्टोबर 2020 अखेरीस त्यातील 75.63% रोपे म्हणजे २१ कोटी जिवंत आहेत,त्याची देखभाल करण्यात येत आहे. 2017 ते 2019 कालावधीत वन विभागाने शासकीय यंत्रणा ,शैक्षणिक संस्था,उद्योगसमूह ,खासगी व्यक्ती यांच्या माध्यमातून 50 कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबाबण्यात आली होती. शारदा स्कॅमची पाळमुळं मुंबईत, SEBIच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर CBIचा छापा ही मोहिम राबवण्यासाठी २०१६-१७ते २०१९-२० दरम्यान २४२९.७८ कोटी निधी मिळाला होता तो पूर्व वापरण्यात आला. 25 टक्के रोपं जिवंत का राहिली नाही याची चौकशी करावी, अशी मागणी मंत्री दत्ताराय भारणे यांनी अधिवेशनात केली होती. त्यानंतर वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी केली जाईल. पुढील सहा महिन्यात चौकशी अहवाल तयार होणार असून तो सादर केला जाईल’, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.