Home /News /mumbai /

जसलोक हॉस्पिटलमध्ये घुसला 'कोरोना', 5 नर्ससह 12 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

जसलोक हॉस्पिटलमध्ये घुसला 'कोरोना', 5 नर्ससह 12 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

मुंबईतील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुप्रसिद्ध जसलोक हॉस्पिटलमध्ये 12 कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूची लागण झाल्याच स्पष्ट झालं आहे.

    मुंबई, 6 एप्रिल: मुंबईतील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुप्रसिद्ध जसलोक हॉस्पिटलमध्ये 12 कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूची लागण झाल्याच स्पष्ट झालं आहे. यात 4 ते 5 परिचारिका, एक स्वयंपाकी, इतर तंत्रज्ञ आणि मदतनीस यांचा समावेश आहे. सध्या संपूर्ण हॉस्पिटल सील करण्यात आलं आहे. आता हे हॉस्पिटल क्वारंटाईन झोन बनले आहे. आतापर्यत रुग्णांसह कर्मचारी अशा 300 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अहवाल यायचा बाकी आहे. हेही वाचा.. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर KDMCने जारी केले कठोर आदेश दुसरीकडे, जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला एक कोरोनाग्रस्त तरुण पूर्णपणे बरा झाला होता. त्या डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करणारा हा करुण 6 मार्चला अमेरिकेतून पॅरीसमार्गे मुंबईत आला होता. मुंबईत आल्यानंतर त्याला सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. नंतर त्याला तातडीने कस्तूरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. नंतर त्याला मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.  31 मार्चला तो पूर्णपणे ठीक झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या तरुणाची पत्नी  आणि मुलगी देखील पॉझिटिव्ह आढळून आली होती. तेही पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, या रुग्णाच्या संपर्कात आल्याने हॉस्पिटलमधील दोन परिचारिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता तर 5 नर्ससह 12 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हाहाकर उडाला आहे. हेही वाचा.. मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात आकडा 41 ने वाढला दरम्यान, राज्यात आज कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण कोरोनारुग्णांची संख्या त्यामुळे 868 झाली आहे. आतापर्यत 70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आज दिवसभरात राज्यात 7 जणांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. हे सगळे रुग्ण मुंबई आणि परिसरात दाखल होते. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या 52 झाली आहे. हेही वाचा..चिंता वाढली.. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त, सरकारने घेतला मोठा
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या