Home /News /money /

Zomato-Blinkit Deal : 10 मिनिटांत किराणा माल घरपोच देण्याचा दावा करणाऱ्या कंपनीशी झोमॅटोने बांधलं संधान

Zomato-Blinkit Deal : 10 मिनिटांत किराणा माल घरपोच देण्याचा दावा करणाऱ्या कंपनीशी झोमॅटोने बांधलं संधान

Zomato-Blinkit Deal चा सामन्य गुंतवणूकदारांवर किंवा तुमच्याआमच्यासारख्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?

  मुंबई, 16 मार्च: ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato Blinkit deal) सगळ्या शहरी नागरिकांना माहिती आहे. आपल्या आसपासच्या रेस्टॉरंट किंवा फूड स्टॉल्सवरचा मेन्यू घरपोच आणून देणारी झोमॅटो अल्पावधीतच लोकप्रिय झालेली startup. झोमॅटोच्या IPO ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावरून या कंपनीची लोकप्रियता लक्षात आली. पण IPO नंतर कंपनीच्या शेअर्सची थोडी पडझड सुरू झाली.  आता ऑनलाईन किराणा घरपोच सेवा देणारी ब्लिंकिट (Blinkit) (पूर्वीची ग्रोफर्स) आणि Zomato या कंपन्यांनी विलीनीकरणाचा करार केला आहे. ब्लिंकिटने नुकतीच झोमॅटोमधील विलीनीकरणाच्या करारावर (Merger Agreement Zomato Blinkit) स्वाक्षरी केली आहे. हा करार सुमारे 700 दशलक्ष डॉलर्सचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत झोमॅटोने एक्सचेंजला (Stock Exchange updates) दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, ब्लिंकिटला त्याच्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झोमॅटो 150 दशलक्ष डॉलर्स कर्ज देईल. ब्लिंकिट आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी निधी उभारण्याची धडपड करत असताना हा करार झाला आहे. त्यामुळे झोमॅटो ब्लिंकिटसाठी तारणहारच ठरली आहे. ब्लिंकिटला आपल्या बिकट आर्थिक व्यवस्थेमुळे कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याची वेळ आली होती, तसंच रोख भांडवलाची बचत करण्यासाठी कंपनीनं आपली गोदामं बंद करायला सुरुवात केली होती. 'झोमॅटोची ही गुंतवणूक या करारांतर्गत मान्य केलेल्या काही परंपरागत अटी आणि इतर अटींच्या पूर्ततेच्या अधीन आहे,' असंही झोमॅटोने म्हटलं आहे. नक्की कशी असते CMAT Exam? पॅटर्नपासून अप्लाय लिंकपर्यंत इथे मिळेल माहिती याआधी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झोमॅटोने (Zomato) ब्लिंकिटमध्ये सुमारे 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यावेळी, झोमॅटोने सांगितलं होतं की, ब्लिंकिटमध्ये एकूण 400 दशलक्ष डॉलर्स गुंतवण्याची त्यांची योजना आहे. यातील काही गुंतवणूक परिवर्तनीय म्हणून संरक्षित केली जाईल. झोमॅटोने त्या वेळी ब्लिंकिटचा 9.3 टक्के हिस्सा विकत घेतला होता, त्याचवेळी संभाव्य विलीनीकरणाचे संकेतही दिले होते. झोमॅटोचा जलद वितरण व्यवसायात प्रवेश ब्लिंकिट ही कंपनी ताब्यात घेऊन झोमॅटोने क्विक-कॉमर्स स्पेसमध्ये (Quick Commerce Space) आपलं स्थान मजबूत केलं आहे. गेल्या वर्षी ब्लिंकिटमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे हे स्पष्ट झालं होतं की, झोमॅटो 2020 मध्ये बंद करण्यात आलेला आपला किराणा माल सेवेचा व्यवसाय या प्लॅटफॉर्मवर आणेल. तिसर्‍या तिमाहीच्या कमाईच्या अहवालात, झोमॅटोने सांगितलं होतं की, क्विक-कॉमर्समध्ये झपाट्यानं पुढं जात असून, पुढील दोन वर्षांत या उद्योगात 400 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करेल. या व्यवहाराचा कोणाला होणार फायदा ब्लिंकिट-झोमॅटो अधिग्रहण व्यवहार 60 दिवसांत पूर्ण होणं अपेक्षित आहे. ब्लिंकिटमध्ये 40 टक्के भागीदारी असलेल्या सॉफ्ट बँकला या व्यवहाराचा भाग म्हणून झोमॅटोमध्ये 4-5 टक्के भागभांडवल मिळेल तर टायगर ग्लोबल आणि सेक्वॉइया कॅपिटलला कंपनीमध्ये अतिरिक्त शेअर्स मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अधिक तपशील जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. जीवन विमा पॉलिसी मुदतीपूर्वीच बंद करताय? थांबा नाहीतर बसेल भुर्दंड ब्लिंकिटमधील प्रमुख गुंतवणूकदारांपैकी एक असलेली सॉफ्ट बँक (Soft Bank) आता झोमॅटोमध्ये शेअर स्वॅपद्वारे हिस्सा ठेवणार आहे. ही हिस्सेदारी 4 ते 5 टक्क्यांदरम्यान असू शकते. याचा अर्थ सॉफ्ट बँक आता झोमॅटो आणि तिची कट्टर-प्रतिस्पर्धी स्विगी या दोघांमध्ये भागीदारी करेल. शेअर बाजारात याचे काय परिणाम दिसतील शेअर बाजारातील (Share Market) तज्ज्ञांच्या मते, सध्या या दोन्ही कंपन्यांपैकी कोणत्याही कंपनीसाठी योग्य वेळ नाही. झोमॅटोच्या शेअरची कामगिरी आधीच खराब झालेली असून, रोखीची उलाढाल चालणारा व्यवसाय हस्तगत करण्यासाठी बाजार त्याला अधिक शिक्षा देऊ शकतो. ब्लिंकिटसाठी, 10:1 इक्विटी स्वॅप अशा झोमॅटोच्या शेअरच्या पडलेल्या किमतीचा अर्थ असा आहे की आता झोमॅटोचे मूल्यांकन 1बिलियन डॉलर्स या युनिकॉर्न स्टेटसच्या खाली येईल. सूत्रांच्या मते, आता ब्लिंकिटचे मूल्य सुमारे 700 दशलक्ष डॉलर्स इतकं असू शकतं. मात्र क्विक-कॉमर्स स्पेसमधील तीव्र स्पर्धेमुळे आणि सतत रोखीच्या गरजेमुळे तिला विलीनीकरण अपरिहार्य झाले असावं. रोकड संपत आल्यानं ब्लिंकिटला आपली काही स्टोअर्स बंद करावी लागली आहेत. शेअर स्वॅप व्यवहाराचे संभाव्य परिणाम सांगताना आनंद राठी अॅडव्हायझर्सचे इन्व्हेस्टमेंट बँकिंग विभागाचे सीईओ समीर बहल म्हणाले, 'शेअर स्वॅप गुणोत्तर आणि ब्लिंकिट शेअर्सचे मूल्यांकन यामुळे अल्प काळासाठी या शेअरवर दबाव असू शकतो. ब्लिंकिटचा व्यवसाय सध्या अडचणीत आहे, मात्र दीर्घकालीन विचार केल्यास बाजारपेठ खूप मोठी आहे आणि झोमॅटोचं नेटवर्क त्यासाठी लाभदायी ठरू शकतं. यामुळे भागधारकांना चांगला लाभ मिळू शकतो.' गुंतवणूकदारांनी काय करावं? 16 मार्च रोजी झोमॅटोच्या शेअर्सनी 2 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. एचएसबीसी सिक्युरिटीज इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 'ब्लिंकिटचे झोमॅटोमध्ये विलीनीकरण झाल्यानं झोमॅटोला ऑनलाईन किराणा बाजारात आपला हिस्सा मजबूत करण्यास मदत मिळाली असून, आता झोमॅटोच्या ग्राहकांना ऑनलाईन किराणामालही उपलब्ध होईल. त्यामुळे हा शेअर लाभदायी ठरेल. बोफा सिक्युरिटीजच्या मते, ब्लिंकिटमध्ये झोमॅटोनं केलेल्या गुंतवणुकीमुळे कंपनीला अधिक तोटा होण्याची शक्यता आहे. रोखीच्या (Cash Flow) टंचाईचा धोका वाढेल. तसंच झोमॅटोचं हे पाऊल, पुढील काही वर्षांसाठी एकाच व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्याच्या पूर्वीच्या वचनबद्धतेशी विसंगत आहे.

  या बँकांमध्ये झाले सर्वाधिक Bank Fraud, तुमचंही खातं यात आहे का?

   आता गुंतवणुकदारांनी हा नवीन शेअर विकत घ्यावा की नाही याबद्दल बोलताना, ग्रीन पोर्टफोलिओचे संस्थापक दिवम शर्मा म्हणाले, 'झोमॅटो सध्या 8 डॉलर्सच्या खाली आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी सध्या हा शेअर घेणं टाळणंच योग्य आहे. त्यात वाढ होण्याची वाट पहावी. ब्लिंकिटचे अधिग्रहण आणि गुंतवणूक यामुळे होणारी वाढ, यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. झोमॅटोच्या मुख्य व्यवसायात वाढ होण्याची वाट पाहण्याची गरज आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घ्यावा.
  आज दुपारी 12:40मिनिटांनी राष्ट्रीय शेअर बाजारात झोमॅटोच्या शेअरची किंमत 0.065 टक्क्यांनी घसरून 76.55 रुपयांवर आली होती. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
  First published:

  Tags: Investment, Startup, Zomato

  पुढील बातम्या