जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / CMAT Exam म्हणजे नक्की काय? परीक्षेच्या पॅटर्नपासून अप्लाय लिंकपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती; जाणून घ्या

CMAT Exam म्हणजे नक्की काय? परीक्षेच्या पॅटर्नपासून अप्लाय लिंकपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती; जाणून घ्या

गर्लफ्रेंड परीक्षेत फेल झाल्याने संतप्त झाला बॉयफ्रेंड.

गर्लफ्रेंड परीक्षेत फेल झाल्याने संतप्त झाला बॉयफ्रेंड.

आज आम्ही तुम्हाला या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची (Last date of CMAT Application) तारीख, CMAT परीक्षा पॅटर्न आणि इतर महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 मार्च: देशातील विविध महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यातील बहुतेक प्रवेश परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच NTA द्वारे घेतल्या जातात. CMAT परीक्षा देखील त्यापैकी एक आहे. CMAT 2022 परीक्षा 9 एप्रिल (CMAT 2022 Date) रोजी होणार आहे. CMAT परीक्षेचा फुल फॉर्म कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (Common Management Admission Test) आहे. CMAT परीक्षेद्वारे, AICTE शी संलग्न महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी (what is CMAT Exam) उमेदवारांची निवड केली जाते. जर तुम्ही देखील CMAT 2022 च्या परीक्षेला (Preparation Tips for CMAT Exam) बसणार असाल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची (Last date of CMAT Application) तारीख, CMAT परीक्षा पॅटर्न आणि इतर महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. Polytechnic नंतरही आहेत करिअरच्या अनेक संधी; या क्षेत्रांमध्ये करा जॉब्स या विषयांवर होते परीक्षा CMAT परीक्षा खूप अवघड आहे आणि पहिल्याच प्रयत्नात ती पास करणे सोपे नाही. CMAT ही संगणकावर आधारित चाचणी आहे म्हणजेच ती ऑनलाइन पद्धतीने द्यावी लागते. CMAT परीक्षेसाठी (CMAT Exam Syllabus) कोणताही विशिष्ट अभ्यासक्रम निर्धारित केलेला नाही. याची तयारी करताना या चार विभागांवर लक्ष केंद्रित करा- भाषा आकलन, परिमाणात्मक तंत्र आणि डेटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस. असं असतं परीक्षेचं पॅटर्न CMAT परीक्षेसाठी दिलेला वेळ 3 तासांचा असतो. CMAT पेपर 4 विभागांमध्ये (CMAT Exam Pattern) विभागलेला असतो. हे सर्व विभाग वेगवेगळ्या विषयांचे आहेत. या चार विभागांमधून एकूण 100 प्रश्न विचारले जातात. हे सर्व मल्टिपल चॉइस फॉरमॅटमध्ये असतात. असं लगेच करा Apply CMAT 2022 परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी, अधिकृत वेबसाइट cmat.nta.nic.in ला भेट द्या. होम पेजवर दिलेल्या ‘CMAT 2022 साठी नोंदणी’ या लिंकवर क्लिक करा. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. यामध्ये, नवीन नोंदणीवर क्लिक करा आणि नंतर एनटीएने दिलेला अर्ज क्रमांक आणि पासवर्डद्वारे CMAT 2022 अर्ज सबमिट करा. महिलांनो, ‘या’ क्षेत्रांमध्ये करिअर करून व्हा यशस्वी; मिळू शकतो लाखो रुपये पगार अर्जाचे शुल्क 200 रुपये निश्चित करण्यात आले असून, ते ऑनलाइन भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2022 असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात