जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Life Insurance | जीवन विमा पॉलिसी मुदतीपूर्वीच बंद करताय? थांबा नाहीतर बसेल भुर्दंड

Life Insurance | जीवन विमा पॉलिसी मुदतीपूर्वीच बंद करताय? थांबा नाहीतर बसेल भुर्दंड

benefits of health insurance india mhsa

benefits of health insurance india mhsa

कोणतीही पॉलिसी खरेदी करण्याआधी घाई करू नका, विमा विक्रेत्याजवळ बसा. त्याच्याकडून पॉलिसीचे लाभ नीट समजून घ्या. पॉलिसी बंद करायची असल्यास त्याची काय किंमत चुकवावी लागेल हेही ते सांगतील आणि अधिक चांगले पर्याय सांगू शकतील. तेव्हा भविष्याचा विचार करून मगच निर्णय घ्या.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 16 मार्च : आपल्याला आर्थिक संरक्षण मिळावं म्हणून अनेक जण विमा काढतात. आपल्या जीवलगांच्या भविष्यासाठी म्हणून विमा काढला जातो. विम्याचे अनेक प्रकार आहेत. विमा उद्योग क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून मात्र मंदी सुरु आहे. याबद्दलचंच वृत्त बिझनेस स्टॅंडर्डने दिलं आहे. मात्र, बऱ्याचदा आपल्याकडून विम्याचे हप्ते वेळेत भरले जात नाही किंवा काही कारणांमुळे पॉलिसी बंद करावी लागते. तुमचंही असच काही सुरू असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. भारतातील 2020-21 दरम्यानच्या विम्याच्या (Life Insurance) आकडेवारीबाबत एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. विमा क्षेत्रात सातत्य गुणोत्तराचं (Continuity Ratio) प्रमाण सातत्यानं कमी असल्याचं यावरून स्पष्ट होतं. 2020-21 या काळात 61 महिन्यांच्या सातत्याची सरासरी 39.4 टक्के होती. 2016-17 पासून ही आकडेवारी 30 ते 40 टक्क्यांच्या दरम्यानच आहे. विमा कंपन्यांच्या (Insurance Companies) किती टक्के पॉलिसी एका ठराविक कालमर्यादेनंतरही म्हणजे एक, तीन, चार किंवा पाच वर्षांनंतरही सुरु आहेत हे सातत्य गुणोत्तरावरून (Continuity Ratio ) लक्षात येतं. कोणत्याही विमा कंपनीची निवड करण्यापूर्वी ही आकडेवारी बघणं आवश्यक आहे. त्या कंपनीकडून संतुष्ट,समाधानी ग्राहक विशिष्ट कंपनीशी दीर्घकाळ जोडलेली राहतात. जीवन विमा उद्योग क्षेत्रात सातत्याच्या गुणोत्तराची आकडेवारी कमी असल्याची अनेक कारणं आहेत. विमा पॉलिसीबद्दल खोटी किंवा चुकीची माहिती देऊन ग्राहकाला विकणं हेही यामागचं एक प्रमुख कारण आहे. सहसा पैसे कसे भरायचे याबाबत ग्राहकांना व्यवस्थित माहिती न देताच पॉलिसी विकली जाते. ‘अनेकदा ग्राहकांना वाटतं की आपण फक्त एकदाच प्रीमियम भरून पॉलिसी खरेदी केली आहे. पण आपल्याला दरवर्षी प्रीमियम भरावा लागणार आहे हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा तो पॉलिसी अर्धवटच सोडतो,‘ असं सिक्युअर नाऊ इन्शुरन्स ब्रोकरचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कपिल मेहता यांनी बिझनेस स्टँडर्डशी बोलताना सांगितलं. Gold Price Today:आज पुन्हा सोने दर घसरला,चांदीचा भावही उतरला;पाहा 10 ग्रॅमचा रेट विमा ही अत्यंत किचकट योजना आहे असं अनेकांना वाटतं. ‘अनेकजण त्यांना पॉलिसीकडून काय अपेक्षा आहेत हे समजून न घेताच पॉलिसी खरेदी करतात. म्हणजे त्यांना फक्त टर्म कव्हर हवं आहे की त्यांना मुलांच्या भविष्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी असा एकत्र प्लॅन हवा आहे, हे नेमकं त्यांच्या लक्षात येत नाही. ही स्पष्टता नसणं हे विमा पॉलिसीचा हप्ता भरण्यात सातत्य नसण्यामागचं मुख्य कारण आहे. जेव्हा पॉलिसीतून पूर्ण होणारी आर्थिक गरज लक्षात न घेताच पॉलिसी खरेदी केली जाते तेव्हा नंतर अपेक्षाभंग होतो. मग ग्राहक अशा पॉलिसीचा हप्ता (प्रीमियम) भरणं बंद करून टाकतात,’असं मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनु लावण्य यांनी बिझनेस स्टँडर्डशी बोलताना सांगितलं. त्याशिवाय अनेकदा ग्राहकांचा गैरसमज होतो. विम्यातून मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या रिटर्नची तुलना ते म्युचअल फंडासारख्या पूर्ण गुंतवणुकीसाठी असलेल्या योजनेशी करतात. मात्र, या दोन्हींतून मिळणारे रिटर्न सारखे नसतात. याचं मुख्य कारण म्हणजे प्रीमियमचा एक भाग हा पूर्णपणे मृत्यू शुल्क (विमा कव्हरच्या पेमेंटसाठी) पूर्ण करण्यासाठीच वापरला जातो. युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप) बाबत ग्राहक अनेकदा बाजारातील स्थितीवर लक्ष ठेवून छोट्या काळासाठीचे निर्णय घेतात. जेव्हा मार्केट वर असतं तेव्हा ते केलेली गुंतवणूक विकण्याचा निर्णय घेतात. असे निर्णय दीर्घ काळासाठी नेहमी त्यांच्या फायद्याचे असतात असं नाही. आपल्याला कधी कोणती समस्या येणार नाही असा अनेकांचा समज असतो. पण जेव्हा आर्थिक संकट येतं तेव्हा असे ग्राहक विम्याचे प्रीमियम भरणं सोडून देतात. छोट्या शहरात बदलला Petrol Diesel दर, तपासा तुमच्या शहरातील लेटेस्ट भाव काही विमा कंपन्या किंवा योजनांसाठी केवळ वार्षिक पैसे भरले जातात. यामध्ये मासिक, त्रैमासिक किंवा सहा महिन्यांच्या पेमेंटची सुविधा मिळत नाही. ‘ज्या प्रकरणांबाबत हा पर्याय उपलब्ध नसतो, त्यामध्ये पॉलिसीधारकांच्या खात्यात पैसे नसल्याने सातत्य गुणोत्तर कमी असतं, ’असं हीरो इन्शुरन्स ब्रोकिंगचे मुख्य कार्याधिकारी आणि मुख्य अधिकारी संजय राधाकृष्णन यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितलं. सहसा ग्राहक त्यांच्या बचतीसाठी अगदी शेवटच्या तारखेला (31 मार्चच्या आधी) जीवन विमा पॉलिसी खरेदी करतात. अशाप्रकारे घाईघाईत पॉलिसी घेतली गेली तर त्याच्या वैशिष्ट्यांवर पुरेसं लक्ष दिलं जात नाही. त्यानंतर आपण चुकीची पॉलिसी घेतल्याचं त्यांच्या लक्षात येतं आणि मग ते ती पॉलिसी अर्धवट सोडतात. आणखीही एक कारण असल्याचं राधाकृष्णन यांनी सांगितलं, ‘काही ग्राहक त्यांचे प्रीमियम (Premium) ज्या बँक खात्यातून जातात ते खातंच बदलून टाकतात पण त्यासाठीचा एनसीएच (NCH) फॉर्म मात्र भरत नाहीत. परिणामी, प्रीमियम नूतनीकरला परवानगी मिळत नाही.’ जीवन विम्यामध्ये अधिकाधिक ग्राहक जोडण्यासाठी प्रयत्न केले जातात. ‘विमा कंपन्या डेटा ॲनेलिटिक्सच्या मदतीने आपल्या योजनांसाठी योग्य आर्थिक स्थिती असणाऱ्या लोकांची निवड करतात. म्हणजे असे ग्राहक जे दीर्घकाळ आपली आर्थिक वचनबद्धता पूर्ण करू शकतील,’असं लावण्य यांनी सांगितलं. पॉलिसी खरेदी करताना हे ग्राहक पॉलिसीचे नियम आणि अटी पूर्णपणे समजून घेतील याची खात्री करण्याचा प्रयत्न या कंपन्या करतात. या कंपन्या ग्राहकांना समजावून देताना काय फायदे मिळणार आहेत याचे ग्राफिक्सच्या बरोबर चित्रांकनही वापरतात. त्यामुळे ग्राहकांना समजणं सोपं जातं. ग्राहकांना भरावे लागणारे प्रीमियम (Premium),भरण्याचा कालावधी आणि योजनांचा लाभ असे मुद्दे समजले आहेत ना याची चाचपणी करण्यासाठी कंपन्या विमा-पूर्व पडताळणी करतात. Financial Year : 31 मार्च आधी ‘ही’ पाच कामं करुन घ्या, नाहीतर मोठं नुकसान होईल या कंपन्या ग्राहकांना एक कॉल करतात. ‘जेव्हा ग्राहकाला त्या पॉलिसीबद्दल पूर्ण माहिती समजली असेल तेव्हाच या कॉलमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तो उत्तरे देऊ शकतो. जर त्याला चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकण्यात आली असेल तर तो प्रश्नांची उत्तरं देऊच शकतच नाही,’ असं लावण्य यांनी सांगितलं. जेव्हा प्रीमियम भरायचा असतो, तेव्हा विमा कंपन्या ग्राहकांना त्याची आठवण करून देतात आणि ज्या खात्यातून प्रीमियम भरला जाणार आहे त्या खात्यात पुरेसे पैसे आहेत याची खातरजमा करण्यासाठीही सांगतात. गेल्या दोन वर्षांमध्ये ग्राहक कोविडमुळे प्रीमियम भरु शकले नाहीत तेव्हा अनेक विमा कंपन्यांनी विलंब शुल्क माफ केलं होतं. विमा कंपन्या आपल्या ग्राहकांना त्यांचं वचन पाळणं सोपं जावं यासाठी वार्षिक प्रीमियम तिमाही किंवा मासिक प्रीमियममध्ये बदलण्याचीही संधी देतात. काही पॉलिसींमध्ये ग्राहक त्यांचे प्रीमियम भरण्याचं नियोजन करण्यासाठी पेड-अप ॲडिशनला सरेंडर करू शकतात. म्हणजेच ते प्रीमियम ऑफसेटचा पर्याय निवडू शकतात. यामध्ये त्यांना प्रीमियम भरण्यापासून ते बोनसपर्यंत सगळ्याचं नियोजन करण्यासाठी मंजुरी मिळते. पॉलिसी बंद करण्याचे दुष्परिणाम पॉलिसी बंद करण्याचे काही वाईट परिणामही होतात. याचा मुख्य परिणाम म्हणजे तुम्हाला विमा कव्हर मिळत नाही. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषत: महामारीसारख्या संकटाच्या काळात याचे परिणाम होतात. ‘ कोणतीही पॉलिसी बंद केल्यास ज्या उद्देशानं ती खरेदी केली आहे तो उद्देश किंवा लक्ष्यावर विपरीत परिणाम होतो. उदाहरणार्थ एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर उत्पन्नात होणारी घट, ’ असं आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सचे कंझ्युमर एक्स्पिरियन्स आणि ऑपरेशन प्रमुख आशिष राव यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितलं. ‘जर तुम्ही एखादी पॉलिसी परत केलीत तर विमा कंपनी त्यासाठी सरेंडर शुल्क आकारते. जर पॉलिसी परत करण्याची काहीही किंमत मिळाली नाही तर आतापर्यंत दिला गेलेला पूर्ण प्रीमियम वाया जातो,’असं मेहता यांनी सांगितलं. ‘अशा वेळेस विम्याची रक्कम आणि बोनससारखे फायदे ग्राहकांना मिळत नाहीत,’ असं लावण्य यांनी सांगितलं. टर्म प्लॅनच्या बाबतीत जेव्हा ग्राहक जुनी पॉलिसी बंद करून नवीन खरेदी करतात तेव्हा सहसा त्यांना जास्त प्रीमियम भरावा लागतो. (कारण तेव्हा त्याचं वय जास्त असतं.) योग्य खरेदी करा तुमच्या गरजेनुसार पॉलिसी खरेदी करणं ही एखादी पॉलिसी बंद होऊ न देण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. असं असेल तरच ग्राहक प्रीमियम अवर्जून भरतात आणि पॉलिसी दीर्घकाळापर्यंत सुरु ठेवतात. त्यासाठी पॉलिसी खरेदी करण्याआधी पूर्णपणे चौकशी करा. तुम्ही स्वत: तर याबाबतची चौकशी कराच पण बाजारात उपलब्ध असलेल्या पॉलिसींशीही त्याची तुलना करा. सध्या अनेक विमा कंपन्यांच्या वेबसाईटवर किंवा ॲग्रीगेटर प्लॅटफॉर्मच्या मार्फत किंवा ऑनलाइन चौकशी करु शकता. ‘आमचा डिजिटल प्लॅटफॉर्म ग्राहकांची गरज आणि त्यानुसार पॉलिसी यांचा मेळ घालण्यात मदत करतो,’ असं राव यांनी सांगितलं. अशा प्रकारे तपासणी केल्यानंतर तुम्हालाही विमा योजनांबाबतची व्यापक माहिती कळू शकेल आणि तुम्ही योग्य पॉलिसी खरेदी करण्यात सक्षम व्हाल. तुम्ही ज्या कंपनीची पॉलिसी खरेदी करणार आहात त्याचा स्कोअर मुख्य परिमाणांवर उच्च असेल याची खात्री करून घ्या. ‘कोणतीही पॉलिसी खरेदी करण्याआधी दावा निकाली निघण्याचं प्रमाण आणि सरासरी वेळ हेही समजून घेणं गरजेचं आहे,’ असंही राव यांनी सांगितलं. थोडक्यात कोणतीही पॉलिसी खरेदी करण्याआधी घाई करू नका, विमा विक्रेत्याजवळ बसा. त्याच्याकडून पॉलिसीचे लाभ नीट समजून घ्या. पॉलिसी बंद करायची असल्यास त्याची काय किंमत चुकवावी लागेल हेही ते सांगतील आणि अधिक चांगले पर्याय सांगू शकतील. तेव्हा भविष्याचा विचार करून मगच निर्णय घ्या.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: insurance , LIC
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात