Home /News /technology /

या बँकांमध्ये झाले सर्वाधिक Bank Fraud, तुमचंही खातं यात आहे का?

या बँकांमध्ये झाले सर्वाधिक Bank Fraud, तुमचंही खातं यात आहे का?

देशात बँकिंग फ्रॉड (Banking Fraud) झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. देशात या फ्रॉडमध्ये कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) सर्वात पहिल्या नंबरवर आहे.

  नवी दिल्ली, 16 मार्च : देशात बँकिंग फ्रॉड (Banking Fraud) झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. देशात या फ्रॉडमध्ये कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) सर्वात पहिल्या नंबरवर आहे. 2021-22 च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यात कोटक महिंद्रा बँकेत बँकिंग फ्रॉडच्या 642 घटना समोर आल्या. या फ्रॉडमध्ये 1 लाख किंवा त्याहून अधिकची फसवणूक झाली आहे. कोटक महिंद्रा बँकेनंतर बँकिंग फ्रॉडमध्ये आयसीआयसीआय बँक (Bank Fraud In ICICI Bank) दुसऱ्या क्रमांकावर आणि इंटसइंड बँक (Bank Fraud In IndusInd Bank) तिसऱ्या क्रमांकावर आहे. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोमवारी संसदेत ही माहिती दिली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने सांगितलं, की केवळ कोटक महिंद्रा बँकमध्ये फ्रॉड झाला नाही, तर अनेक लहान-मोठ्या बँकांमध्येही बँकिंगसंबंधी हेराफेरी झाली आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ICICI Bank मध्ये 518 बँकिंग फ्रॉडची प्रकरण समोर आली आहेत. सर्वाधिक फ्रॉडच्या तिसऱ्या क्रमांकावर IndusInd Bank असून या बँकेत 377 फ्रॉड केसेस समोर आल्या आहेत. तसंच अॅक्सिस बँकेत (Axis Bank) 235, HDFC बँक (HDFC Bank) 151 आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) 159 फ्रॉडच्या घटना समोर आल्या आहेत.

  हे वाचा - मोबाइल दुकान चालकाच्या खात्यात सापडलं 300 कोटीचं घबाड, IT च्या नोटिशीतून खुलासा

  अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Minister of State for Finance Bhagwat Karad) यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षात सायबर क्रिमिनल्सकडून फसवणूक होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मागील काही काळापासून सतत सायबर फ्रॉड कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच या घटनांमध्ये बरीच घट झाली आहे. त्याशिवाय सर्वच बँका आपल्या ग्राहकांना अधिक सावध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  हे वाचा - बँकिंग फ्रॉडपासून बचाव करेल Aadhaar Card, करावं लागेल हे एक काम

  त्याशिवाय भागवत कराड यांनी कोटक महिंद्रा बँकेत मागील काही वर्षात झालेल्या फ्रॉडची माहिती दिली. RBI च्या आकडेवारीनुसार, 2017 मध्ये 135 फ्रॉड, 2018 मध्ये 289, 2019 मध्ये 383 आणि 2020 मध्ये 652 फ्रॉडची प्रकरणं समोर आली. तर 2021 मध्ये बँकिंग फ्रॉडच्या घटना 826 पर्यंत पोहोचल्या. आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये पहिल्या 9 महिन्यात फ्रॉडची संख्या 642 पर्यंत पोहोचली.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Axis Bank, Cyber crime, Hdfc bank, Icici bank, Money fraud, Online fraud

  पुढील बातम्या