मराठी बातम्या /बातम्या /मनी /गोव्याचा प्लॅन रद्दच करावा लागणार! कोरोनामुळे घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

गोव्याचा प्लॅन रद्दच करावा लागणार! कोरोनामुळे घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

यावर्षी कोरोनामुळे अनेक पर्यटनाचे प्लॅन रद्द झाले आहेत. खासकरून गोवा ट्रीपचे प्लॅन रद्द झाल्याचं दु:ख अनेकांना आहे. आता तुम्ही पुन्हा गोव्याचा प्लॅन करत असाल तर आणखी काहीशी प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल

पणजी, 24 जून: भारतामध्ये गोवा हे (Tourism in Goa) असं पर्यटन स्थळ आहे जिथे देशातूनच नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. मात्र कोरोना काळात (Coronavirus) या पर्यटन व्यवसायाचं (Tourism in India) मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचे गोव्याला जायचे प्लॅन रद्द झाले आहेत. आता तुम्ही पुन्हा गोव्याचा प्लॅन करत असाल तर आणखी काहीशी प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल. मंत्री आणि भाजप नेते मायकेल लोबो म्हणाले की, राज्यात पर्यटक येण्याकरता जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, कोरोना संक्रमणाची प्रकरणं पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत आता पर्यटन सुरू होण्याासाठी वाट पाहावी लागणार आहे.

लोबो यांनी असं म्हटलं आहे, गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना लसीचे डोस आणि आरटी-पीसीआर चाचणीचे दोन्ही नकारात्मक अहवाल सादर करणं बंधनकारक असेल. गोव्यामध्ये संसर्ग रोखण्यासाठी 28 जूनपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात संसर्गाची नवीन प्रकरणे कमी झाली आहेत आणि सक्रीय रूग्णांची संख्याही 2,795 वर आहे.

हे वाचा-Indian Oil च्या लकी ड्रॉमध्ये मिळेल मोबाइल आणि TV? वाचा काय आहे दावा

जुलैपर्यंत पाहावी लागणार वाट

पर्यटन पुन्हा सुरू करण्याबाबत लोबो असं म्हणाले की, त्याकरता जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल आणि संक्रमणाची प्रकरणं पूर्णपणे शून्य होत नाही तोपर्यंत पर्यटन सुरू करण्यात येणार नाही. त्यांनी असं म्हटलं आहे की गोवा जेव्हा उघडण्यात येईल तेव्हा पर्यटकांची पूर्ण स्क्रीनिंग केली जाईल. राज्यात पर्यटन दुसऱ्यांदा सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांपर्यंत पर्यटकांना आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आणि दोन्ही लशींचे डोस अनिवार्य असतील. शिवाय मास्क देखील बंधनकारक असेल.

हे वाचा-सौरऊर्जेबाबत Relianceचं मोठं पाऊल, मोदींचं हे लक्ष्य साध्य करण्यासाठी निर्णय

काही दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Goa CM Doctor Pramod Sawant) यांनी देखील काही आदेश जारी केले होते. देशातील इतर राज्यांप्रमाणेच गोव्यातही कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यात इतर राज्यांमधून गोव्याला पर्यटक आल्यामुळे गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा राज्यात जोपर्यंत सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळत नाही तोपर्यंत गोव्यातील पर्यटन व्यवसाय संपूर्ण बंद असणार आहे असे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिले होते.

मायकल लोबो यांनी महिन्याच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं की देशात कोरोना संक्रमणाची स्थिती नियंत्रणात आल्याशिवाय राज्यातील नाइटलाइफ सुरू केली जाणार नाही.

First published:

Tags: Goa, South Goa