नवी दिल्ली, 24 जून: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries) चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्सच्या आजच्या 44व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (Reliance AGM 2021) काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पैकी सौरऊर्जेविषयीची (Solar Energy) घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी असे म्हटले की, 'मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, जामनगर याठिकाणी 5000 एकर जागेवर Dhirubhai Ambani Green Energy Giga Complex उभारण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ही सुविधा जगातील सर्वात मोठ्या अशा इंटिग्रेटेड नूतनीकरणक्षम ऊर्जा उत्पादनांपैकी ही एक असेल.'
काही टप्प्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं अंबानी म्हणाले. पहिल्या टप्प्यामध्ये चार गिगा फॅक्टरी उभारण्याचे काम होईल. यामध्ये न्यू एनर्जी इकोसिस्टमचे सर्व क्रिटिकल घटक तयार केले जातील आणि पूर्णपणे इंटिग्रेट केले जातील. त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये इंटरमिटंट ऊर्जेसाठी प्रगत उर्जा संग्रहण बॅटरी फॅक्टरी बनवण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीसाठी electrolyser factory ची उभारणी केली जाईल. तर त्यांनंतर हायड्रोजनचे मोटिव्ह आणि स्थिर शक्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी इंधन सेल कारखान्याची उभारणी केली जाईल. पुढील 3 वर्षांत या उपक्रमांमध्ये 60,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.
हे वाचा-Reliance AGM 2021: कोरोना काळात रिलायन्सचे 5 मिशन, COVID विरोधात असा दिला लढा
मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, ही पहिली एकात्मिक सौर फोटोव्होल्टिक गीगा फॅक्टरी (Integrated Solar Photovoltaic Giga Factory) सौर उर्जा तयार करेल. परवडणारे सौर मॉड्यूलची उपलब्ध करण्यासाठी आम्ही जगातील सर्वात कमी किंमतींचे लक्ष्य साध्य करण्याचे लक्ष्य ठेवणार असल्याचंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2030 पर्यंत 450GW नूतनीकरणक्षम उर्जा क्षमता संपादन करण्याच्या उद्दीष्टातून आम्ही प्रेरणा घेत असल्याचं मुकेश अंबानी म्हणाले. त्यांनी अशी घोषणा केली की, 2030 पर्यंत रिलायन्स कमीतकमी 100GW सोलर एनर्जी स्थापित करेल. छतांवरील सोलर आणि खेड्यातील विकेंद्रीकृत इन्स्टॉलेशन हे यातील महत्त्वाचे मुद्दे असतील. ग्रामीण भागासाठी लाभ आणि समृद्धी यावी याकरता हा निर्णय असेल.
डिस्क्लेमर: https://lokmat.news18.com/ चालविणार्या नेटवर्क 18 आणि टीव्ही 18 या कंपन्या स्वतंत्र मीडिया ट्रस्टच्या नियंत्रणाखाली आहेत, याचा रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mukesh ambani, Reliance, Reliance group, Reliance Industries, Reliance Industries Limited