जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Indian Oil च्या लकी ड्रॉमध्ये मिळेल मोबाइल आणि टीव्ही? वाचा काय आहे व्हायरल मेसेजचं सत्य

Indian Oil च्या लकी ड्रॉमध्ये मिळेल मोबाइल आणि टीव्ही? वाचा काय आहे व्हायरल मेसेजचं सत्य

Indian Oil च्या लकी ड्रॉमध्ये मिळेल मोबाइल आणि टीव्ही? वाचा काय आहे व्हायरल मेसेजचं सत्य

PIB Fact Check: असा दावा केला जात आहे की, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 40 व्या वर्धापन दिनानिमित्त लकी ड्रॉची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 जून: विविध सोशल मीडियावर अशी पोस्ट व्हायरल होत आहे की, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 40 व्या वर्धापन दिनानिमित्त लकी ड्रॉची घोषणा केली आहे. लोकांना पाठविल्या जाणाऱ्या या मेसेजमध्ये इंडियन ऑइलच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना विविध मोहक बक्षिसे जिंकण्याचा दावा केला जात आहे. हा संदेश मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि असा दावा केला जात आहे की जे लोकं लकी ड्रॉमध्ये भाग घेतील त्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणं, स्मार्टफोन, टीव्ही इत्यादी गॅझेट जिंकण्याची संधी मिळेल. आता लोकांना या व्हायरल मेसेजबद्दल सरकारने नागरिकांना इशारा दिला आहे. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्युरो या संस्थेच्या फॅक्ट चेक (PIB Fact Check) टीमने हा दावा फेटाळला आहे. PIB ने हा मेसेज बनावट असल्याचे म्हटले आहे. PIB ने असं म्हटलं आहे की दावा खोटा आहे आणि अशाप्रकारे दावा करणाऱ्या कोणत्याही वेबसाइटवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. हे वाचा- HDFC बँक देतेय ‘त्या’ ग्राहकांना 18 हजारांचा रिफंड, बातमी वाचून पटकन करा क्लेम पीआयबीने काय केलं आहे ट्वीट?

जाहिरात

पीआयबी फॅक्ट चेकने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या (PIB Fact Check) टीमद्वारे हा एक स्कॅम अलर्ट म्हणून घोषित केलं आहे. सरकारकडून अशी माहिती देण्यात आली आहे की अशाप्रकारे कोणताही लकी ड्रॉ आयोजित करण्यात आलेला नाही. हा क्लेम फेक असल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे. शिवाय अशा वेबसाइट आणि फॉरवर्ड्सवर विश्वास न ठेवण्यााचं आवाहन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , PIB
  • First Published :
जाहिरात
जाहिरात